खरी समृद्धी ज्ञानातूनच निर्माण होते – डॉ. श्रीपाल सबनीस

Date:

लक्ष्मी रोडची ओळख सरस्वतीच्या ज्ञानपरंपरेशीही जोडली जावी – डॉ.श्रीपाल सबनीस लक्ष्मी रोडवर ज्ञानाचा जागर;

‘वॉव’ भव्य पुस्तक प्रदर्शनाचे डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुण्यातील लक्ष्मी रोडची ओळख केवळ व्यापार आणि वैभवापुरती मर्यादित न राहता ती सरस्वतीच्या ज्ञानपरंपरेशीही जोडली जावी. सोन्यापेक्षा ज्ञानाची श्रीमंती मोठी असून, खरी समृद्धी ज्ञानातूनच निर्माण होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. लक्ष्मी रोडवरील जुन्या विजय टॉकीजजवळ असलेल्या ‘वॉव पब्लिशिंग्ज प्रांगणा’त आयोजित ‘वॉव’ भव्य पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे विशाल सोनी, इतिहास संशोधक संदीप तापकिर आणि तेजज्ञान फाउंडेशनच्या प्रेमा भटेवरा उपस्थित होते. लक्ष्मी रोडवर साड्या आणि सोन्याच्या खरेदी-विक्रीला मोठे महत्त्व आहे. याच परिसरात पुस्तक प्रदर्शनाच्या माध्यमातून ज्ञानाचा आणि वाचनसंस्कृतीचा जागर घडविणे ही ऐतिहासिक आणि स्वागतार्ह बाब आहे, असे डॉ. सबनीस यांनी नमूद केले. संपत्तीपेक्षा ज्ञानाचे महत्त्व अधिक असून, वाचनामुळे समाजात विवेक, विचारशीलता आणि वैचारिक समृद्धी वाढते, असेही त्यांनी सांगितले.आध्यात्मिक गुरू सरश्री यांच्या साहित्यिक योगदानाचा उल्लेख करताना डॉ. सबनीस म्हणाले की, अध्यात्म, मानसिकता, जीवन व्यवस्थापन आणि आत्मविकास या क्षेत्रांत सरश्री यांचे कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये ३०० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. मानवाचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकास साधणे हा त्यांच्या साहित्याचा मुख्य उद्देश आहे. सरश्री यांच्या पुस्तकांमधून वाचकांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची, स्वतःला समजून घेण्याची आणि जीवन अधिक समृद्ध व अर्थपूर्ण बनविण्याची प्रेरणा मिळते.या प्रदर्शनात मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील २० हजारांहून अधिक पुस्तकांचा समृद्ध संग्रह उपलब्ध आहे. धार्मिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा त्यात समावेश आहे. विविध वयोगटांतील वाचक, विद्यार्थी, साहित्यप्रेमी आणि अभ्यासकांसाठी हे प्रदर्शन ज्ञान, मनोरंजन आणि वैचारिक समृद्धीची पर्वणी ठरणार आहे.‘वॉव’ भव्य पुस्तक प्रदर्शन २२ नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे. पुस्तकप्रेमी, विद्यार्थी आणि साहित्यरसिकांनी या प्रदर्शनाला आवर्जून भेट देऊन वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता पौराणिक यांनी केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तबला-पखवाज जुगलबंदी अन्‌ संतूरवादनातून ’हाजरी’

पुणे : तबला आणि पखवाजवादनाची जोरकस जुगलबंदी आणि संतूरवाद...

भीमाशंकर जंगलतोड वादात नवे वळण! ‘आमचा संबंध नाही’ — अदानी समूह; ‘प्रकल्प आमचाच’ — टॉरेंट पॉवर

३२,४९० वृक्षांच्या तोडीचा प्रश्न कायम; २३३ हेक्टर वनजमिनीवरील ३,०००...

‘भाजप नेत्यांना राहुल गांधी फोबिया झालाय का?’ — गोपाळदादा तिवारी

राहुल गांधी 'अनुत्पादक व अपयशी' असतील, तर पंतप्रधान मोदी,...