अरविंद एज्युकेशन सोसायटीत विविध उपक्रमांनी बालदिन साजरा
पिंपरी / प्रतिनिधी
अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर स्कूल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात बालदिनाचे औचित्य साधून बालोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रेट लीडर्स, फँसी ड्रेस स्पर्धा, कागदापासून मुखवट, टाकावू पासून टिकावू वस्तु बनविने अशा विविध उपक्रमांनी बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटपही करण्यात आले. यावेळी सोसायटीच्या सचिव आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी बालचमुंनी आम्हीही चाचा नेहरुंचा आदर्श समोर ठेऊन देशासाठी चांगले काम करु, अशी प्रतिज्ञा केली. चिमुकल्यानी विविध प्रकारची वेशभूषा करीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्वातंत्रवीर सावरकर, राधा-कृष्ण, चाचा नेहरू यांच्या भूमिका साकारल्या. तर कुणी पोलीस, पोस्टमन काका, डॉक्टरची वेशभूषा साकारली होती. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत कुणी टोमॅटो, कुणी मिरची, तर कुणी वांगे,कुणी द्राक्षे, भोपळा, तर कुणी मोर बनले होते.
विद्यार्थ्यांनी बनविलेल्या टाकाऊ पासून टिकावू वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या वस्तूंचे सर्वानीच कौतुक केले. एकंदरीत रंगीबेरंगी वेषभूषांनी शाळेचा परिसरही नटला होता. बालचमूंच्या या आनंदात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.