पुणे-: पाचगणी येथे रवाई रन माउंटन मॅरेथॉनचे दुसरे सत्र 3 डिसेंबर रोजी रंगणार आहे.
पाचगणी येथे होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेला माला यांचा पाठिंबा लाभला आहे. तसेच, याचबरोबर माला रेनबो 5किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.
रवाईन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत यावर्षी एकूण 7लाख रुपयांची पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे. या स्पर्धेत 18वर्षावरील स्पर्धकांसाठी 21किलोमीटर, 16वर्षांवरील स्पर्धकांसाठी 10किलोमीटर, 10वर्षावरील स्पर्धकांसाठी माला 5किलोमीटर रन अशा तीन प्रकाराचा समावेश आहे.
यंदाची शर्यत हि पाचगणी येथील संजीवन हायस्कुल येथून सुरु होणार असून संपूर्ण शहरातून तसेच ऐतिहासिक सेंट पिटर्स स्कुल येथून आणि ऐतिहासिक अशा भव्य वृक्ष राजीतून आणि पाचगणी व महाबळेश्वरच्या निसर्गरम्य अशा पर्वतरांगामधून, तसेच राजपुरी केव्स मार्गे जाऊन परत फिरणार आहे व संजीवन मैदान येथेच या शर्यती चा समारोप होणार आहे.
रवाईन रन माउंटन मॅरेथॉन हि शर्यत अस्सल धावपटू साठी खास आकर्षण ठरणार आहे. तसेच, ज्यांचे धावण्यावर अतिशय प्रेम आहे, अशा हौशी धावपटू साठी हि शर्यत विशेष आकर्षण ठरणार आहे. या शर्यतीला सातारा हिल मॅरेथॉन शर्यतीचा एक भाग असेही म्हटले जाते. यंदाच्या वर्षी हि शर्यत सातारा हाफ हिल मॅरेथॉन आणि मुंबई रोड रनर्स यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीतील विजेत्यांबरोबरच सर्व सहभागी धावपटूना पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे, तसेच, शर्यत पूर्ण करणाऱ्या धावपटूना स्ट्रॉबेरी विथ क्रीम अशी खास ट्रीट देण्यात येणार आहे. तसेच, पाचगणीतील अनेक हॉटेल्स मध्ये सवलतीच्या दरात मुक्काम करण्याची संधी त्याचप्रमाणे टीशर्ट व पाचगणीतील अनेक खास वस्तूंचा समावेश असलेली गुडी बॅग्स, पदके व टाईम बीब देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी www.ravinehotel.com या वेबसाइटवर भेट देण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे.