शिवगंगादेवी विद्यालयात बालदिन साजरा
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती ( बाल दिन ) व श्री. सुनील रुकारी यांच्या ६०वा वाढदिवस निमित्त श्री. काशी विश्वनाथ शिक्षण संस्था व श्री. संत शिवगंगादेवी विद्यालय पुणे येथे साजरा करण्यात आले. या प्रसंगी ज्यो किड्स क्लब संस्थेतील अंध व ग्रस्त मुले मुली उपस्थित होते.अंध व ग्रस्त मुले मुली यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुला मुलींनी नेहरू यांच्या जीवनाचे अनेक प्रसंग सादर केले.
श्री. सुनी रुकारी ( संचालक द विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड ) यांचे श्री. संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट व श्री. काशी विश्वनाथ शिक्षण संस्था तर्फे साल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
श्री. सुनील रुकारीआपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले माझ्या आविश्यातला हा मोठा दिवस आहे कि मी आज या अंध व एड्सग्रस्त मुले मुली बरोबर साजरा करीत आहे. या बालचमूंचे स्वागत करतो व या पुढे कायम स्वरूपी या दिवशी त्यांना माझ्या तर्फे या संस्थेतील सर्व अंध व एड्सग्रस्त मुले मुली सर्वाना जेवण देईन व आज रोजी या संस्थेला रुपय ६०,००० धनादेश जाहीर करीत आहे.
काशी विश्वनाथ शिक्षण संस्थे तर्फे ११,००० तर श्री. संत माई याच्या जन्मशताब्दी निमित्त ११,००१ चा धनादेश जाहीर करण्यात आले.
या प्रसंगी उल्हास पवार,अभय छाजेड, नरेंद्र व्यवहारे, श्रीकांत तोडकर, डॉ. महादेव सगरे, रामेश्वर कुरंजखेडे, आशिष व्यवहारे इत्यादी उपस्थित हॊते.
कार्यक्रमाची प्रस्तावना नरेंद्र व्यवहारे यांनी केली तर रामेश्वर कुरंजखेडे यांनी आभार मानले.