महापौर मुक्ता टिळक यांच्याकडून ‘ स्वातंत्र्यवीरायण ‘ च्या कलाकारांचे कौतुक

Date:

पुणे :
 
‘ पुण्यातील युवा  रंगकर्मींनी  एकत्र येऊन  केलेल्या ‘ स्वातंत्र्यवीरायण ‘ या स्वातंत्र्यवीर वि. दा . सावरकर यांच्या जीवनगाथेवरील नाटकाच्या सादरीकरणाला रविवारी दुपारी पुणेकरांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला . यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथील प्रयोगादरम्यान  पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी कलाकारांची भेट घेऊन त्यांचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या .
 
 ‘युवा कलाकारांनी हा विषय कला सादरीकरणासाठी निवडला हीच मोठी कौतुकाची गोष्ट आहे ‘ असे त्या म्हणाल्या . 
 
प्रसिद्ध युवा कलाकार  अथर्व कर्वे दिग्दर्शित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग  शनिवारी दुपारी  भरत नाट्य मंदिर येथे झाला होता ,त्यानंतर दुसरा प्रयोग यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे  रविवारी दुपारी झाला . याही प्रयोगाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला .
निर्माता डॉ . डी . एन .गंजेवार ,गौरी बीडकर ,सौ . वर्षा कर्वे उपस्थित होते .
‘स्वातंत्र्यवीरायण ‘नाटकाचे लेखक अथर्व देशपांडे ,शार्दूल अनसिंगकर असून दिग्दर्शन अथर्व कर्वे याने केले आहे . डॉ . डी . एन . गंजेवार हे निर्मिता आहेत .
​​
 अथर्व कर्वे, ऐश्वर्या तुपे, आदित्य बीडकर, पूर्वा देशपांडे, ऋत्विक व्यास, अमित कुलकर्णी, सोहम देवधर ,पार्थ कुलकर्णी, ऋत्विक  व्यास ,राजस कुलकर्णी यांच्या भूमिका या नाटकात आहेत .  नेपथ्य सोनम चव्हाण यांचे असून वेशभूषा पूर्वा देशपांडे यांची आहे .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जैन धर्म म्हणजे केवळ राजस्थानी गुजराती नव्हे-मिलिंद फडे

पुणे-"जैन धर्मिय म्हणजे केवळ राजस्थानी गुजराती नव्हे तर जैन...

पुणे-पिंपरीतील हवेचा दर्जा सुधारण्यासाठी जिल्हा प्रशासनाचा मास्टरप्लॅन…

आरएमसी प्लांट आता रडारवर:जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केली...

संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता’ या विषयावर उच्चस्तरीय चर्चासत्र

​‘ऑपरेशन सिंदूर’ला एक वर्ष पुर्ण झाल्याच्या निमित्ताने ब्रह्मा रिसर्च...