Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नयना पुजारी खून खटल्यात तिघे दोषी … चौथा, माफीचा साक्षीदार सुटला

Date:

 

पुणे- ऑगस्ट 2009 मधील संगणक अभियंता नयना अभिजित पुजारी (26) बलात्कार आणि खून प्रकरणात 3 जणांना सोमवारी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. श्रीमती एल.एल. येंकार यांच्या खंडपीठाने आरोपी योगेश अशोक राऊत, महेश बाळासाहेब ठाकूर आणि विश्वास हिंदुराव कदम यांच्या दोष सिद्ध केले. तर, आरोपींचा सहकारी राजेश पांडुरंग चौधरी माफीचा साक्षीदार बनून सुटला आहे.

येथील बहुचर्चित नयना पुजारी खून खटल्यात  सोमवारी न्यायालयाने अंतिम निकाल दिला. गेल्या सात वर्षांपासून शिवाजीनगर सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु होती. अखेर आज विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी या खटल्याचा निकाल जाहीर केला. यावेळी न्यायालयाकडून योगेश राऊत, विश्वास कदम आणि महेश ठाकूर या तिन्ही आरोपींना दोषी ठरवण्यात आले. या तिघांवरील बलात्कार, अपहरण, खून आणि चोरीचे आरोप सिद्ध झाले आहेत. तर माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची सुटका करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाकडून उद्या तिन्ही आरोपींना शिक्षा सुनाविण्यात येईल.

या निकालानंतर नयना पुजारी यांच्या नातेवाईकांनी दोषींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी केली. तसेच या शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. खुनाच्या आरोपींना ज्याप्रकारे फाशीची शिक्षा दिली जाते. त्याप्रमाणे बलात्कार करणाऱ्या आरोपीलाही फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया नयना पुजारी यांचे पती अभिजीत पुजारी यांनी व्यक्त केली. दरम्यान, या खटल्याच्या सुनावणीसाठी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात आणण्यास उशीर झाला. न्यायालयाकडून याची गंभीर दखल घेण्यात आली असून पोलिसांना याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे.

या खटल्यात सरकारी पक्षाकडून ३७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. तर बचाव पक्षाकडून अ‍ॅड. बी. ए. अलुर, रणजीत ढोमसे पाटील, अंकुशराजे जाधव काम पाहात होते. बचाव पक्षाकडून १३ साक्षीदार तपासण्यात आले  होते.

संगणक अभियंता नयना अभिजीत पुजारी (वय २८, रा. अशोकाआगम, दत्तनगर, कात्रज) या ८ ऑक्टोबर २००९ रोजी कामावरून घरी निघाल्या होत्या. त्यावेळी हडपसर येथे सोडण्याचा बहाणा करून मोटारचालक आणि त्याच्या साथीदारांनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर नयना पुजारी यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आला होता. त्यांचा मृतदेह खेड तालुक्यातील जरेवाडी फाटा येथे टाकून देण्यात आला होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती.

पोलिसांकडून या गुन्ह्य़ाचा तपास करून आरोपी योगेश अशोक  राऊत (वय २४), राजेश पांडुरंग चौधरी (वय २३, दोघे रा. गोळेगाव, ता. खेड, जि. पुणे) महेश बाळासाहेब ठाकूर (वय २४, रा. सोळू, ता. खेड, जि. पुणे), विश्वास हिंदूराव कदम (वय २६, रा. दिघी, आळंदी रस्ता, मूळ रा. भुरकवाडी, ता. खटाव, जि. सातारा) यांना अटक करण्यात आली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

व्याकरणाला भाषा विज्ञानाची जोड हवी : प्रा. यास्मिन शेख

शंभरी पार केलेल्या प्रा. यास्मिन शेख यांचा सुहृदांच्या उपस्थितीत...

“शेतकऱ्यांचे संरक्षण अत्यावश्यक, हिंगोलीत बोगस खत विक्री प्रकरणी तातडीने कारवाई करा”

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या कृषी विभागाला सूचना हिंगोली, दि....