Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

परिवर्तन घडवून आणण्यासाठी युवकांची शक्ती अटळ आहे – रिषभ शाह

Date:

पिंपरीतील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलने प्रथमच भूषविले यजमानपद

 

पुणे:- संयुक्त राष्ट्रसंघ व आंतरराष्ट्रीय व्यवहारांची कल्पना देणाऱ्या इंडियन इंटरनॅशनल मॉडेल युनायटेड नेशन्स पुणे शाखा (आयआयएमयूएन) नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली. तीन दिवसांच्या या परिषदेचे पिंपरीतील गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलने प्रथमच यजमानपद भूषविले. यावेळी बोलताना आयआयएमयूएनचे संस्थापक संचालक रिषभ शाह म्हणाले, ‘‘जर १.२ अब्ज लोकांवर ५  देश वर्चस्व गाजवू शकत नाहीत. जगातील सर्वात सामर्थ्यवान संस्थेत १.२अब्ज लोकांचे प्रतिनिधित्व व्हावे, हे पूर्णपणे योग्य आहे.आजचे युवक बौद्धिकदृष्ट्या प्रेरित असून ते पुन्हा एकदा परिवर्तनाचा आवाज म्हणून तीन दिवसांच्या मध्ये एकत्रित झाले आहेत.’’

 

  

ऑर्किड इंटरनॅशनल स्कूल, प्रतिमा पलांडे इंग्लिश स्कूल,लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूल, महिंद्रा इंटरनॅशनल स्कूल,इंडस व्हॅली इंटरनॅशनल स्कूल आणि यजमान जीजी इंटरनॅशनल स्कूल या सहा शाळांतील ९१ प्रतिनिधींनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

 

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उदय शंकर पणी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. उपस्थितांना संबोधित करताना श्री. पणी यांनी जीवनात यश मिळविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीकडे आवश्यक असलेल्या काही महत्वाच्या मूल्यांवर भर दिला. त्यानंतर आयआयएमयुएनच्या सरचिटणीस अरुशी सिंघी यांनी अधिवेशन सुरू झाल्याची घोषणा केली.

 

परिषदेच्या दुसऱ्या दिवशी तीन महत्त्वाच्या समित्यांनी घेतलेले मुद्दे समोर आले. संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद(यूएनएससी),लोकसभा आणि महिला सुरक्षाबाबतचा आयोग (सीएसडब्ल्यू) या स्थापन झालेल्या तीन समित्या होत्या. प्रत्येक समितीकडे एक विशिष्ट विषयपत्रिका होती.त्यावर विविध देशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधींनी चर्चा केली, वादविवाद केला आणि विचारमंथन केले.यूएनएससीने ‘सायबर वॉर’ या जागतिक समस्येवर चर्चा केली. त्यात या सतत विस्तारत असलेल्या समस्येवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा केली. लोकसभेने ‘निश्चलनीकरण धोरणाची कार्यक्षमता आणि परिणामकारकता सुधारणे’हा मुद्दा उचलला. सीएसडब्ल्यूने महिलांसुरक्षेशी संबंधित विविध  प्रश्नांवर चर्चा केली उदा. ‘मुली व स्त्रियांच्या विरोधात सर्व प्रकारच्या हिंसाचाराचे उच्चाटन आणि प्रतिबंध’.

 

तरुण प्रतिनिधींनी त्यांनी लिहिलेल्या शोध निबंधांवर चर्चा केली. त्यांनी घेतलेल्या समस्यांवर प्रचंड  एकाग्रतेने असंख्य उपाय आणि योजनाबद्ध धोरण सादर केले. युवा प्रतिनिधींनी प्रत्येक मुद्द्यामध्ये सखोल रस दाखवला.सर्वोत्कृष्ट शिष्टमंडळाचा पुरस्कार महिंद्रा इंटरनॅशनल स्कूलला संपूर्ण परिषदेतील निर्दोष सादरीकरण आणि कामगिरीबद्दल देण्यात आला. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...