पुणे-
शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना (24 बाय 7) राबविण्यासाठी पालिका प्रशासनाकडून घाईगडबड सुरु झाली आहे मात्र ही योजनाच फसवी असून समान पाणीपुरवठ्याच्या नावाखाली पुणेकरांना लुटण्याचा डाव आहे. त्यातही ‘बनवा-बनवी ‘ करून महापालिकेला कर्जाच्या खाईत लोटण्याचा प्रकार प्रशासनाकडून सुरु असल्याने वेळप्रसंगी तो हाणून पाडण्यासाठी पुणेकरांच्या हितासाठी न्यायालयात याचिका दाखल केली जाईल असा इशारा माजी उपमहापौर आबा बागुल यांनी प्रशासनाला दिला आहे. शिवाय या योजनेबाबत काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरेही आयुक्तांकडे मागितली आहेत.
याबाबत आयुक्तांना दिलेल्या पत्रात आबा बागुल यांनी म्हटले आहे कि , समान पाणीपुरवठ्याच्या योजनेसाठी प्रशासनाकडून जी घाईगडबड सुरु आहे ते पाहता ही योजना फसवी असल्याचे स्पष्ट होत असून त्यात महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.शिवाय त्यासाठी करदात्या पुणेकरांनाही वेठीस धरले जाणार आहे.
समान पाणीपुरवठा योजनेसाठी पुण्यात किती लाख लिटर क्षमतेच्या टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे,त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे आणि त्या टाक्यांची ठिकाणे याची इत्यंभूत माहिती प्रशासनाने दिली पाहिजे त्याचबरोबर चोवीस तास पाणीपुरवठ्यासाठी किती इंचाची पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. जलवाहिन्यांची लांबी किती ,त्यासाठी किती खर्च येणार आहे आणि २४ बाय ७ या योजनेसाठी किती लोकांना मीटर देण्यात येणार आहेत? एका मीटरची किंमत किती ? पालिका पाणी हे पंपिंग की ग्रॅव्हिटीद्वारे देणार आणि त्यासाठी किती पंपिंग स्टेशन तसेच त्याला किती खर्च येणार ?त्याचबरोबर खोदाईचा खर्च किती होणार आणि त्यानंतर रस्त्यांच्या डांबरीकरण ,क्रॉंक्रीटीकरण यावर किती रक्कम खर्ची पडणार ? या योजनेसाठी इस्टिमेट कॉस्ट आणि टेंडर कॉस्ट किती आहे ? इस्टिमेट कॉस्ट काम पूर्ण होईपर्यंत राहणार का ? या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे माजी उपमहापौर आबा बागुल यांनी आयुक्तांकडे मागितली असून ही योजना घाईगडबडीत राबवू नये अन्यथा पुणेकरांच्या हितासाठी न्यायालयात धाव घेतली जाईल तसेच फौजदारी गुन्हाही दाखल केला जाईल असा इशाराही आबा बागुल यांनी दिला आहे.
ऑनलाईन वॉटर मीटरिंग कंट्रोल सिस्टीममुळे
3 हजार कोटींच्या कर्जाचा भार टळणार
3 हजार कोटींच्या कर्जाचा भार टळणार
शहरासाठी समान पाणीपुरवठा योजना (24 बाय 7) राबविण्यासाठी आता महापालिकेला 3000 कोटी रुपयांचे कर्ज घेण्याची आवश्यकताच भासणार नाही शिवाय पाण्यावरून नेहमीच बदनाम ठरणार्या पुणेकरांनाही दिलासा मिळणार आहे. याकडेही माजी उपमहापौर आबा बागुल यांनी लक्ष वेधले आहे.
विशेष म्हणजे पाण्याची गळती कुठे?, कुणाला किती वितरण, वापर किती याचा हिशेब ’एसएमएस’च्या माध्यमातून मिळणार तर आहेच तसेच पाण्याच्या टाक्या न उभारता, जलवाहिनी न बदलता, आहे त्या यंत्रणेतून पुणेकरांना दरडोई 135 लिटर पाणी चोवीस तास मिळणारी ऑनलाईन वॉटर मीटरिंग कंट्रोल सिस्टीम माझ्या प्रभागात कार्यान्वित झाली आहे.त्याद्वारे दहा हजार नागरिकांना मुबलक समान पाणी मिळत आहे.
या ऑनलाईन मीटरींग कंट्रोल सिस्टिमबाबत माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, समान पाणीपुरवठा योजनेसाठी या यंत्रणेमुळे तीन हजार कोटींचे कर्ज काढण्याची कोणतीही गरज नाही. अगदी किफायतशीर दरात ही यंत्रणा कार्यन्वित होणार आहे.शहरासाठी तीन हजार नव्हे तर ५०० कोटी रुपयांमध्ये ही योजना सहजशक्य आहे.
ऑनलाईन वॉटर मिटरींग कंट्रोल सिस्टीम हे सॉफ्टवेअर पालिकेचा पाणीपुरवठा विभाग असो अथवा जलकेंद्र त्या-त्या ठिकाणी हे सॉफ्टवेअर बसविल्यानंतर स्टॅण्डर्ड शेड्यूल्ड, नॉन स्टॅण्डर्ड शेड्यूल्ड याचे वन टाईम सेटींग केले जाते. ही यंत्रणा अगदी मोबाईलवरूनही ऑपरेट होऊ शकते. शिवाय ती सुरक्षितही आहे. पंपिग स्टेशनमधून शहराला पाणीपुरवठा केला जातो. शहरात विविध ठिकाणी पाणीपुरवठा करताना सोसायट्यांच्या संपवेलमध्ये मीटर बसविले जाईल आणि सोसायटी त्यांच्या इमारतीमधील सदनिकांना पाणीपुरवठा करेल. प्रत्येक सदनिकेमधील कुटुंबाला प्रति माणसी पाणी पुरवठा आणि वेळ निर्धारीत केला जाईल. रिमोट, सर्व्हर, इंटरनेट, फ्लो मीटर, कंट्रोल वॉल्व असे या यंत्रणेचे स्वरुप आहे. सद्यस्थितीत पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रचंड ताण आहे. तो या यंत्रणेमुळे संपुष्टात येईल, अशी ही यंत्रणा आहे. प्रत्येक नागरिकाला समान पाणी देतानाच पाण्याची बचत आणि गळती याचा हिशोबही या यंत्रणेमुळे मिळणार आहे.त्यामुळे कार्यान्वित झालेल्या या ऑनलाईन वॉटर मिटरींग कंट्रोल सिस्टीमची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी करून संपूर्ण माहिती घ्यावी असेही आबा बागुल यांनी स्पष्ट केले आहे.