अव्हेरनेस क्लब क्रिकेट करंडक स्पर्धेत एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी संघाची आगेकुच

Date:

पुणे: ट्रिनिटी इंजिनिअरींग व इंजिन इनसाईट  प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने आयोजित अव्हेरनेस क्लब क्रिकेट करंडक स्पर्धेत एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी संघाने ट्रिनिटी सी.ओ.ई संघाचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

के.जे इन्स्टिटयूट, पुणे येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रभाकर ठाकरेच्या दमदार  81 धावांच्या बळावर एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी संघाने ट्रिनिटी सी.ओ.ई संघाचा 49 धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी संघान 20 षटकात 9 बाद 180 धावा केल्प्रया. यात  निखिल वाघने 22 व अनिकेत कुंभारने 16 धावा करून भाकरला सुरेख साथ दिली. 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रिनिटी सी.ओ.ई संघाचा डाव 20 षटकात 8 बाद 131 धावांत रोखला. यात अमोल ठोंबरेने 25 तर शिवलिंग अन्सीरेने 21 धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी संघाकडून लैकीक सुर्यवंशी 3 तर निखिल वाघने 2 गडी बाद करत संघाला विजय मिळवून दिला.  प्रभाकर ठाकरे सामनावीर ठरला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी

एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी- 20 षटकात 9 बाद 180 धावा(प्रभाकर ठाकरे  81(42), निखिल वाघ 22, अनिकेत कुंभार 16, कुणाल टिळेकर 4-27, रोहन हवळे 2-37, शुभम सुराना 1-25, अक्षय येवले 1-40) वि.वि ट्रिनिटी सी.ओ.ई- 20 षटकात 8 बाद 131 धावा(अमोल ठोंबरे 25, शिवलिंग अन्सीरे 21, लैकीक सुर्यवंशी 3-20, निखिल वाघ 2-22) सामनावीर- प्रभाकर ठाकरे

एच.के बाऊंस क्रिकेट अकादमी संघाने 49 धावांनी सामना जिंकला. 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आयुक्तसाहेब……… महापालिकेच्या निष्काळजीपणाचे आणखी किती बळी जाणार? ड्रेनेजच्या खड्ड्याने घेतला ५५ वर्षीय व्यक्तीचा बळी !

पुण्यातील येरवडा मच्छी मार्केट परिसरात ड्रेनेज लाईनच्या कामासाठी खोदलेल्या...

‘धरणातल्या पाण्याचाच हिशेब काय मागता ? महापालिकेला TDR चाही हिशेब विचारा!’

‘थेंब थेंब पाणी जपा’ सांगणाऱ्या महापालिकेकडून TDR ची मात्र...

पुण्याला २१.३४ टीएमसी पाण्याची गरज; मुळशीचे पाच टीएमसी पाणी पाच वर्षांपासून कागदावरच!

८३ लाख लोकसंख्येच्या पाणीपुरवठ्याचे आव्हान; २०२१ पासून प्रस्ताव, तरी...

‘आठ वर्षे उलटली, तरी पुण्याची २४×७ पाणीपुरवठा योजना अपूर्ण !’

पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार असताना समान पाणीपुरवठा योजनेच्या अंमलबजावणीवर...