पुणे – ग्रामीण शिक्षणामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या ट्रस्टी सुनंदाताई पवार यांना ‘फिक्की लेडीज ऑर्गनायझेशन – पुणे चॅप्टर (फिक्की फ्लो) यांच्याकडून सन्मानित करण्यात आले. ‘फिक्की-फ्लो’ हा ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री’ (फिक्की) चा एक विभाग आहे. जे डब्ल्यू मॅरियट येथे झालेल्या एका कार्यक्रमात पंचशील रिअॅलिटीचे चेअरमन अतुल चोरडीया यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी सुनंदाताई पवार म्हणाल्या की ‘फिक्की-फ्लो’कडून हा पुरस्कार स्वीकारताना त्यांना अतिशय आनंद झाला आहे. ग्रामीण भागातील महिला व बालकांसाठी गेली अनेक वर्षे हे कार्य करत असून यापुढेही अशाच प्रकारे काम करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.