‘एमआयटी कॉलेज ऑफ रेल्वे इंजिनिअरिंग अँड रिसर्च’ या भारतातील पहिल्या रेल्वे अभियांत्रिकी महाविद्यालयाची बार्शी, जि. सोलापूर येथे स्थापना!

Date:

पुणे- माईर्स एमआयटी शिक्षण समूहा अंतर्गत बार्शी, जि. सोलापूर येथे‘एमआयटी कॅालेज अ‍ॅाफ रेल्वे इंजिनिअरींग अ‍ॅण्ड रिसर्च’ या अभिनव स्वरूपाच्या रेल्वे अभियांत्रिकी महाविद्यालयाची सुरुवात शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये जुन-जुलै दरम्यान होणार आहे. सदरील रेल्वे अभियांत्रिकी महाविद्यालयास अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने नुकतीच मान्यता दिलेली असून, हे भारतातील पहिले रेल्वे अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय असणार आहे.
आजवर आपल्या संपूर्ण भारत देशातील रेल्वेच्या प्रगतीचा व विकासाचा विचार करता रेल्वे अभियंत्यांचेे योगदान अत्यंत मोलाचे व महत्त्वपूर्ण राहिलेले आहे. भारताची प्रचंड लोकसंख्या आणि विशाल भौगोलिक क्षेत्र लक्षात घेता, भारतीय रेल्वे व्यवस्था या पुढेही सुधारणे व ती आधुनिक करणे आवश्यक आहे. जेणेकरून रेल्वेचे जाळे देशातल्या काना-कोपर्‍यात आणि दुर्गम प्रदेशांमध्ये पोहोचू शकेल. वेगवान इंजिने, सुरक्षित प्रवासी वाहतूक, विनाविलंब माल वाहतूक या गोष्टी सुलभ होण्यासाठी रेल्वे तंत्रज्ञान व व्यवस्थापन यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुधारणा व आधुनिकीकरण करण्याची गरज आहे. त्यादृष्टीने भविष्यकाळामध्ये रेल्वे इंजिनिअरिंग व्यवस्थापनामध्ये व्यापक सुधारणा करण्याच्या दृष्टीने उच्चविद्याविभूषित आणि प्रशिक्षित रेल्वे अभियंत्यांची नितांत गरज आहे. देशामधील अनेक शहरांमध्ये झपाट्याने मेट्रो रेल्वेचा विकास होत आहे. अशाप्रकारचेे प्रकल्प हाताळण्यासाठी प्रशिक्षित अभियंत्यांची आवश्यकता आहे.
ब्रिटीश राजवटीत सुरु झालेल्या रेल्वे व्यवस्थेमध्ये वेगमर्यादा, सुविधा, कंपन, सिग्नलिंग, देखभाल व इतर बाबींमध्ये ज्या प्रमाणात सुधारणा होणे अपेक्षित होते, त्या दुर्दैवाने झाल्या नाहीत व रेल्वेची एकंदर अवस्था ही एक काळजीची बाब बनून राहिली आहे. या उलट इतर प्रगत देशात रेल्वे व्यवस्था इतकी प्रगत आणि परिणामकारक आहे की, बरेचसे प्रवासी विमान प्रवासापेक्षा रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात.
आज देशभरात रेल्वेचे साधारणपणे 1,20,000 किलोमिटरचे जाळे पसरलेले असून,  रेल्वे व्यवस्थेमध्ये सध्या सुमारे 14 ते 15 लाख लोकांना रोजगार पुरविणारी भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठी सार्वजनिक व्यवस्था मानली जाते. साहजिकच, ही संख्या संपूर्ण देशातील सर्वात मोठी संख्या आहे. रेल्वे व्यतिरिक्त रेल्वेच्या असंख्य कारखाने व प्रकल्पांसाठी प्रशिक्षित रेल्वे अभियंत्यांची गरज आहे.
आजमितीला जगभर रेल्वे इंजिनिअरिंग आणि प्रशिक्षण या विषयांमध्ये अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत, जिथे असे वैशिष्ठ्यपूर्ण अभ्यासक्रम चालवले जातात. एकट्या चीन देशामध्ये 80 च्यावर अशा प्रकारचे अभ्यासक्रम चालवले जातात. याउलट भारतामध्ये एरोस्पेस इंजिनिअरींग, एरॉनॉटिकल इंजिनिअरिंग, मरिन इंजिनिअरिंग इ. विशिष्ट कार्यक्षेत्राशी निगडीत अभ्यासक्रम शिकविले जात असूनसुद्धा, रेल्वे इंजिनिअरिंग सारखा अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम आजपर्यंत पदवीस्तरावर सुरू झाला नाही, ही खेदाची बाब आहे.
‘रेल्वे इंजिनिअरिंग’ (रेल्वे अभियांत्रिकी) ही एक सर्वसंपन्न अशी विद्याशाखा आहे, जिच्यामध्ये रेल्वे व्यवस्थेशी संबंधित आराखडा, बांधकाम/निर्मिती आणि ऑपरेशन या बाबींचा समावेश आहे. या विद्याशाखेत सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, इंडस्ट्रियल आणि प्रॉडक्शन इंजिनिअरिंग अशा विविध शाखा सम्मिलित आहेत. भविष्यात येणार्‍या नव्या आव्हानांना, तंत्रज्ञानाच्या विकासाला आणि सामाजिक, आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांना आपण जसजसे सामोरे जाऊ तसतसे रेल्वे व्यवस्था अभियांत्रिकी (Railway Systems Engineering) ही एक अत्यंत अत्यावश्यक विद्याशाखा म्हणून आपल्यासमोर उभी राहणार आहे. अर्थातच, उच्च विद्याविभूषित पदवीधारक, पदव्युत्तर पदवीधारक आणि पीएच.डी. पदवीधारक व संशोधक या सर्वांची देशाला अत्यंतिक गरज भासणार आहे.
केवळ भारतातच नव्हे, तर जगभर सातत्याने विकसित होणार्‍या रेल्वे व्यवस्थेला जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ पुरविणे ही काळाची गरज ‘एमआयटी कॅालेज अ‍ॅाफ रेल्वे इंजिनिअरींग अ‍ॅण्ड रिसर्च’ तर्फे पूर्ण केली जाईल. या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेल्या अभियंत्यांना भविष्यकाळात रोजगाराच्या व संशोधनाच्या असंख्य संधी उपलब्ध होतील. अशी माहिती संस्थेतर्फे प्रसिद्ध करण्यात आली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रांगोळ्यातून उलगडले छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य 

धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, पुणे...

हडपसरमध्ये रक्ताच्या कर्करोगावरील अत्याधुनिक उपचारांना नवी दिशा: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये यशस्वी ऑटोलॉगसस्टेमसेल प्रत्यारोपण

नियमित आरोग्य तपासणीतून रक्ताच्या कर्करोगाचे निदान; मेकॅनिकल इंजिनिअरने केली कर्करोगावर यशस्वी मात पुणे, 26 जून 2026: हडपसर येथे राहणारे 46 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर ऋतिक मेहरा यांच्यासाठी जानेवारी 2026 मधील नियमित वार्षिक आरोग्य तपासणी आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. कोणतीही लक्षणे नसताना आणि नेहमीप्रमाणे काम सुरू असतानाच त्यांच्या रक्त तपासणीत हिमोग्लोबिनचे प्रमाण अत्यंत कमी असल्याचे आढळले. पुढील तपासणीत त्यांना IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा या अस्थिमज्जेतील प्लाझ्मा पेशींमध्ये होणाऱ्या रक्ताच्या कर्करोगाचे निदान झाले. IgA लॅम्बडा (Lambda) मल्टीपल मायलोमा हा प्लाझ्मा पेशींचा (Plasma Cells) एक प्रकारचा कर्करोग आहे, ज्यामध्ये शरीरातील असामान्य प्लाझ्मा पेशी लॅम्बडा लाईट चेन (Lambda Light Chain) नावाचे मोनोक्लोनल प्रोटीन जास्त प्रमाणात तयार करतात। सामान्यतः आपल्या शरीरातील प्लाझ्मा पेशी संसर्गाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज बनवतात, परंतु या आजारात त्या निकामी आणि हानिकारक प्रोटीन्स बनवू लागतात.  "उपचारांपेक्षा कर्करोगाचे निदान स्वीकारणे माझ्यासाठी अधिक कठीण होते," असे ऋतिक मेहरा यांनी सांगितले. "मी पूर्णपणे सामान्य आयुष्य जगत होतो आणि मला कोणतीही लक्षणे नव्हती. नियमित आरोग्य तपासणीतून अचानक कर्करोग झाल्याचे समजल्याने मोठा धक्का बसला. मात्र माझ्या पत्नीने संपूर्ण काळात मला सकारात्मक राहण्यासाठी प्रोत्साहन दिले. उपचार आणि स्टेम सेल प्रत्यारोपणाची प्रक्रिया माझ्या अपेक्षेपेक्षा खूपच सुरळीत झाली आणि आता मी हळूहळू माझ्या दैनंदिन आयुष्यात परतत आहे." निदानानंतर ऋतिक यांनी केमोथेरपीच्या तीन सायकल्स पूर्ण केल्या. त्यानंतर डॉक्टरांनी ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. या प्रक्रियेत रुग्णाच्याच स्टेम सेल्सचा वापर करून उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर रक्तपेशींची निर्मिती पुन्हा सुरू करण्यास मदत केली जाते.  त्यांना 15 मे 2026 रोजी सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्कमधील रुग्णालयात  दाखल करण्यात आले. उच्च मात्रेतील केमोथेरपीनंतर, पूर्वी संकलित केलेले त्यांचे स्टेम सेल्स 16 मे 2026 रोजी पुन्हा शरीरात प्रत्यारोपित करण्यात आले. कोणत्याही गुंतागुंतीशिवाय ही प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली आणि उत्कृष्ट प्रकृतीसह त्यांना 2 जून 2026 रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. या प्रकरणाविषयी बोलताना डॉ. चंद्रकांत लहाणे, सल्लागार हिमॅटॉलॉजिस्ट व हिमॅटो-ऑन्कोलॉजिस्ट, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर, म्हणाले, "मल्टिपल मायलोमा हा कर्करोग सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता वाढू शकतो. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणीमुळे या रुग्णामध्ये आजाराचे लवकर निदान होऊ शकले. पात्र रुग्णांमध्ये ऑटोलॉगस स्टेम सेल प्रत्यारोपण हा मल्टिपल मायलोमावरील अत्यंत प्रभावी उपचार पर्याय असून, यामुळे दीर्घकालीन चांगले परिणाम आणि अधिक सखोल रेमिशन मिळण्यास मदत होते." ही केस रुग्णालयासाठीही महत्त्वपूर्ण ठरली असून, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, हडपसर येथे बोन मॅरो ट्रान्सप्लांट सेवा यशस्वीपणे सुरू झाल्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे हडपसर, मगरपट्टा, खराडी, वानवडी, हांडेवाडी, सासवड, बारामती, अकलूज, सोलापूर आणि आसपासच्या परिसरातील रुग्णांना अत्याधुनिक रक्ताच्या कर्करोगावरील उपचार अधिक सुलभ होणार आहेत. इंडियन सोसायटी फॉर ब्लड अँड मॅरो ट्रान्सप्लांटेशन (ISBMT) च्या माहितीनुसार, भारतात 1983 ते 2022 या कालावधीत 26,843 बोन मॅरो आणि स्टेम सेल प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. मात्र, दरवर्षी सुमारे 39,000 रुग्णांना या उपचारांची आवश्यकता असतानाही प्रत्यक्षात केवळ सुमारे 2,000 प्रत्यारोपणेच केली जातात. या सेवांच्या विस्ताराविषयी बोलताना डॉ. शशिकांत आपटे, संचालक – हिमॅटॉलॉजी, सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नगर रोड, म्हणाले, "अधिकाधिक रुग्णांना त्यांच्या घराजवळ वेळेत आणि प्रभावी उपचार मिळावेत यासाठी प्रादेशिक स्टेम सेल प्रत्यारोपण केंद्रे बळकट करणे अत्यंत आवश्यक आहे. हडपसर येथे ही सेवा सुरू होणे हे अत्याधुनिक हिमॅटॉलॉजी उपचार अधिक व्यापकपणे उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे." श्री. सगीर सिद्दीकी, प्रादेशिक संचालक – पश्चिम विभाग, मणिपाल हॉस्पिटल्स, म्हणाले,...

युवकांच्या शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगारासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी समाजातील युवकांच्या सर्वांगिण विकासासाठी सारथीचे उल्लेखनीय कार्य पुणे, दि....