पुणे-श्रीपाद सोलापूरकर यांचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाल्याबद्दल महापौरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला.
कै. सॅक्स सुप्रीनो मनोहारी सिंग हे श्रीपाद सोलापूरकर यांचे गुरु. गुरुस्मरणार्थ गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनोहारी सिंग यांच्या पुण्यतिथी दिवशी श्रीपाद सोलापूरकर दरवर्षी सॅक्सोफोन वादनाचा कार्यक्रम करतात. परंतु गुरुप्रती एका अभिनव पद्धतीने आदर व्यक्त करण्यासाठी त्यांनी सलग ७ तास ५१ सॅक्सोफोन वादनाचा विक्रम केला, ज्याची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे घेण्यात आली.
लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल ३१ मार्च रोजी महापौर सौ. मुक्ता टिळक यांच्याहस्ते श्रीपाद सोलापूरकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आलाप सोलापूरकर आणि नमिता सोलापूरकर यांनी केले. याप्रसंगी शैलेश टिळक, ईनोक डॅनियल, सुर्यकांत कुलकर्णी, वसंत लिमये, प्रा. न. म. जोशी, अशोकराव गोडसे, जितेंद्र भूरूक, शेखर सोलापूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.