मुंबई-: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आपण केवळ सदिच्छा भेट घेतली. त्याचा कुठलाही राजकीय अन्वयार्थ काढू नये. शरद पवार यांच्यावर मध्यल्या काळात शस्त्रक्रिया झाल्या. म्हणून ही केवळ त्यांची सदिच्छा भेट होती, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे स्पष्ट केले आहे.
आज सोमवारी (ता.३१) दुपारी फडणवीस यांनी मुंबई येथे शरद पवार यांची घरी जाऊन भेट घेतली. त्यानंतर ही भेट नेमकी कशासाठी असा प्रश्न आणि उत्सुकता राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झाला आणि जोरदार चर्चा सुरु झाली.