पुणे- सायन्स अँड टेक्नोलॉजी इनोव्हेशन पार्क च्या वतीने न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनीच्या सी एस आर उपक्रमाद्वारे भीमाशंकरच्या दुर्गम भागातील गावां-वाड्या मध्ये एक हजार सायटेक सूर्या सौर दिव्यांचे वाटप येत्या २ ऑगस्ट रोजी करण्यात येणार असून पार्क च्या वतीने महाराष्ट्रातील .. जिथे अंधार तिथे प्रकाश योजनेचा प्रारंभ विविध स्वयंसेवी संस्था आणि उद्योजक यांच्या मदतीने करण्यात येत असल्याचे
सायन्स अँड टेक्नोलॉजी इनोव्हेशन पार्क चे संचालक डॉ . राजेंद्र जगदाळे यांनी येथे सांगितले . आज त्यांनी न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी चे उपमहाव्यवस्थापक जी के पाटील आणि विभागीय व्यवस्थापक विश्वास गायकवाड यांच्या उपस्थिती पत्रकार परिषद घेवून आपल्या उपक्रमाबाबत माहिती दिली . गेल्या वर्षी आम्ही नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील विद्यार्थ्यांना १००० सौर दिवे दिले होते . यंदा भीमाशंकरच्या आदिवासी पट्ट्यातील वाड्या वस्त्यांमध्ये २४८ घरांमध्ये हे दिवे देणार आहेत यासाठी
न्यू इंडिया अॅश्युरन्स कंपनी ने आर्थिक सहाय्य केले आहे .
पाहू यात डॉ. जगदाळे नेमके काय म्हणाले …