सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह, जनआधार आणि वनराई संस्थेच्या वतीने प्लास्टिक कॅरिबॅगबाबत जनजागृती कार्यकम
कचरावेचक पर्यावरण संरक्षकाची भूमिका बजावणार
पुणे :
‘सेव्ह पुणे इनिशिएटिव्ह’, ‘जनआधार’ आणि ‘वनराई’ संस्थेच्या वतीने प्लास्टिक कॅरिबॅगबाबत आज जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांर्तगत सिंहगड रोडवरील राजाराम पुलाजवळील मातोश्री वृद्धाश्रामा शेजारील भाजी मंडईमध्ये कचरा वेचक अनिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वयंंसेवी संस्थांच्या मदतीने प्लास्टिक कॅरिबॅगबाबत जनजागृती करण्यात आली. हा उपक्रम शहरात अनेक ठिकाणी राबविण्यात येणार असून, कचरावेचक पर्यावरण संरक्षकाची भूमिका बजावणार आहेत.
’मातोश्री वृद्धाश्रामा शेजारील भाजी मंडईमधील प्लास्टिक कॅरिबॅग घेणारे ग्राहक व विके्रेते यांना गांधीगिरीने मोगर्याचे रोप देऊन 50 मॉयक्रॉनपेक्षा कमी जाडीची कॅरिबॅग वापरू नये’ अशा सूचना यावेळी दिल्या. पुणे महानगरपालिकेमार्फत तीन वेळा सूचना देऊन न ऐकणार्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे ‘जनाआधार’ चे ललित राठी यांनी यावेळी सांगितले. कचरावेचक पर्यावरण संरक्षकाची भूमिका बजावणार आहेत, असे अनिल मिसाळ यांनी सांगितले.
या जागृती कार्यक्रमासाठी ‘वनराई’चे मुकुंद शिंदे, उद्योजक लक्ष्मीप्रसाद दाते, मनीषा कोष्टी (पुणे जिल्हा सह. गृह महासंघाच्या व लक्ष्मी हरी स्मृती न्यासाच्या प्रतिनिधी), साहेबराव म्हस्के, सतीश खाडे (रोटेरियन), कचरावेचक अनिल मिसाळ उपस्थित होते. पुणे मनपा वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाचे विभागीय निरीक्षक दीपक ढेलवान यांनी या उपक्रमास मार्गदर्शन केले.
20 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या ग्राहकांना देणारे विक्रेते तानाजी ठोंबरे, जगन्नाथ देवकुळे, मंगल शिर्के, आनंद शेंडे, अनिता कदम, मंगल अडिल, अनुराधा निकम, मोहन भालशंकर, जे. डी. ठाकूर, स्वतः कापडी पशवी आणणारे ग्राहक अरविंद जगताप, अनघा थोरात, माधव गोहाड देखिल यावेळी उपस्थित होते. सतीश खाडे (रोटेरियन) यांनी ओला कचरा जिरवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.