Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

खंडणीखोर नगरसेवकाच्या टोळीचा का लागेना तपास ? गोळीबार धनकवडीत झाला कि नाही ?

Date:

पुणे- खंडणीखोर नगरसेवकाच्या टोळीचा का लागेना तपास ? गोळीबार धनकवडीत झाला कि नाही ? सीएसआर घोटाळ्याबद्दल महापालिका आयुक्त कुणाल कुमार स्पष्टीकरण देणार कि नाही? अशा प्रश्नांनी सध्या पुण्याचे राजकारण ढवळून निघाले आहे .
‘सकाळ’ सारख्या पुण्यातील जुन्या आणि विश्वासार्ह अशा  नामवंत दैनिकातून खंडणीखोर नगरसेवकाच्या  टोळीने  बिबवेवाडी परिसरात थैमान घातल्याचे वृत्त पहिल्या पानावर पहिल्या क्रमांकाने प्राधान्याने प्रसिध्द झाले . पण ना पोलिसांच्या, ना महापालिका प्रशासनाच्या स्तरावरून कोणीही याबाबत वाच्यता केली नाही … का केली नाही ? प्रकरण खरे नाही काय ? खरे असेल तर वाच्यता का नाही ? कारवाई का नाही ? सर्वत्र चिडीचूप कसे ? असा प्रश्न असतानाच धनकवडी मध्ये गोळीबाराची बातमी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये झळकली …इथे हि पुढे काय झाले ? हा प्रश्न आहेच . अर्थात कोणीही आपली विशेष बातमी काढली तर तिच्या पाठीशी राहण्याच्या जुन्या परंपरेतील पत्रकारांना ही या प्रश्नाने पछाडले आहे . तर महापालिका मुख्य सभेत अविनाश बागवे यांनी सिएसआर घोटाळाप्रकरणी प्रश्न उपस्थित करून महापालिका आयुक्तांपुढे  वादळ उभे केले आहे … यावर आयुक्त काही खुलासा करणार आहे कि नाही ? मुख्यसभेत कोणकोणते प्रश्न उपस्थित होणार ? यावर हि आता खल होणार आहे . अशातच धनकवडी तील सुयोग हॉस्पिटल जवळील गजांत हॉटेल वर झालेली अतिक्रमण कारवाई का रोखण्यात आली ? कोणी हि कारवाई पूर्ण करू दिली नाही ? असे ही अनंत प्रश्न आता निर्माण होत आहेत ..
सोबत आपल्या न्यूज पोर्टलवर ..या बातम्यांची कात्रणे वाचा …

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...