सल्लागार कंपनी व काही ठेकेदारांचा पुणेकरांच्या तिजोरीवर ‘डल्ला’!-खासदार संजय काकडे आक्रमक

Date:

पुणेकरांचा एक रुपयाही वाया जाऊ देणार नाही – खासदार काकडे

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार; प्रसंगी कॅग, सीबीसी व कोर्टात जाण्याची खासदार काकडेंची तयारी

पुणे : शहरातील समान पाणी वाटपाच्या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेचे काम अत्यंत संशयास्पद व गंभीर आहे. या संपूर्ण प्रकाराची कल्पना आपण स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. याप्रकरणी आपण कॅग, सीबीसी व न्यायालयातही वेळ पडल्यास जाऊ. परंतु, पुणेकरांचा एक रुपयाही वाया जाऊ देणार नाही, अशा स्पष्ट शब्दांत भाजपचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी सल्लागार कंपनी व तिच्याशी संगनमत करून काम मिळवू पाहात असलेल्या काही ठेकेदारांना समान पाणी वाटपाच्या निविदातील गैरप्रकाराविषयी इशारा दिला आहे.

खासदार काकडे म्हणाले की, पहिल्या निविदा प्रक्रियेत असलेल्या सल्लागर कंपनीने चुकीचे काम केल्याचे ताशेरे प्रशासनानेच मारले आहेत. असे असताना महापालिका आयुक्तांनी त्या सल्लागार कंपनीवर कारवाई करण्याऐवजी तिच्यावर मेहेरनजर दाखवित पुन्हा त्याच कंपनीच्या सल्लाने आता निविदा प्रक्रिया राबविली आहे. नव्याने होत असलेल्या निविदा प्रक्रियेत चांगल्या दर्जाच्या स्टील पाईपचे दर बाजारात 50 हजार रुपये प्रति टन असताना यांनी मात्र 80 हजार रुपये प्रति टन लावले आहेत. याबरोबरच, 4 हजार रुपये किमतीचा एक मीटर 9 हजार रुपयांना खरेदी करणार असल्याचे म्हटले आहे. मीटर उत्पादक कंपन्यांकडून खरेदीचे दर न मागविताच निविदात मीटरचे दर समाविष्ट केले आहेत. प्रथमदर्शनी आम्हास या दोन वस्तुंच्या बाजारातील किमतीत व निविदांमधील किमतीत मोठी तफावत आढळली आहे. संपूर्ण निविदा प्रक्रियेची आम्ही कसून तपासणी करीत आहोत. महापालिका आयुक्त चुकीचे काम करणाऱ्या सल्लागार कंपनीस का पाठिशी घालत आहे? आणि तिच्यावर कारवाई का करीत नाही? असा प्रश्न पडला आहे. मुख्यमंत्री फडणवीस चुकीचे काम करणाऱ्या या सल्लागार कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकतील आणि नवीन सल्लागार कंपनी नेमून नव्याने पारदर्शकतेने निविदा प्रक्रिया राबवतील अशी मला आशा आहे, असेही खासदार काकडे म्हणाले.

समान पाणी वाटप प्रकल्पाचे काम 1400 ते 1500 कोटी रुपयांत होऊ शकते. परंतु, सल्लागार कंपनीच्या चुकीच्या सल्ल्यानुसार ही निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. पहिल्या निविदा प्रक्रियेवेळीही सल्लागार कंपनीने चुकीचे काम केले होते. पहिल्यावेळची निविदा 2800 कोटी रुपयांची होती. ती 28 टक्क्यांनी वाढवून भरली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास ही बाब आणल्यानंतर त्यांनी या निविदा रद्द केल्या आणि पूर्वीपेक्षा अधिक स्पर्धात्मक व खुल्या स्वरुपात पुन्हा निविदा काढण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना दिल्या होत्या. मात्र, आताच्या निविदा प्रक्रियेत सुरु असलेला प्रकार संशयास्पद आहे. पहिल्या निविदा प्रक्रियेतील तीन कंपन्यांनाच यावेळीही निविदा भरता येतील अशा अनुकूल शर्थी व अटी तयार करण्यात आल्याने इतर कंपन्या या निविदा प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाहीत. तसेच, भागिदारीत कंपन्या काम करु शकणार नाहीत अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.

पहिल्या निविदा प्रक्रिया रद्द करताना पुणेकरांचे 800 ते 900 कोटी रुपये वाचविले होते. त्यामुळे हा प्रकल्प 2300 कोटीवर आला. आता ऑप्टिकल फाइबर डगचे काम स्मार्ट सिटीअंतर्गत होत असल्याने 200 कोटी रुपये वाचतील व तो 2100 कोटीवर येईल. परंतु, मीटर व स्टील पाईपच्या दरातील तफावत पाहता चुकीच्या पद्धतीने अपारदर्शकतेने ही निविदा प्रक्रिया पुन्हा राबविली जात असल्याचे स्पष्ट होते. हा पुणेकरांच्या पैशावर सल्लागार कंपनी काही ठेकेदारांशी संगनमत करून डल्ला मारत आहे. पारदर्शकपणे निविदा प्रक्रिया राबविल्यास समान पाणी वाटपाचा प्रकल्प 1400 ते 1500 कोटी रुपयांतच पूर्ण होऊ शकतो. महापालिकेतर्फे दरवर्षी पाणीपुरवठ्यासाठी 400 ते 500 कोटी रुपयांची तरतूद केली जाते. तसेच, या प्रकल्पाचे काम पुढील 4 ते 5 वर्षे चालणार असल्याने महापालिका त्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करू शकते. त्यासाठी कर्ज काढण्याची आवश्यकता नाही. कर्जाशिवाय हा प्रकल्प होऊ शकत असताना सल्लागार कंपनीच्या चुकीच्या सल्ल्यानुसार काम होत आहे. परंतु, कोणत्याही प्रसंगी पुणेकरांचा एकही रुपया वाया जाऊ देणार नाही, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.