मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी वर्षाला 25 लाखांचा प्रस्ताव

Date:

मुंबई-येथील महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापन आणि प्रसिद्धीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून सुमारे 25 लाख रुपयांचा खर्च करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. 19 ऑगस्ट रोजी हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. 1 ऑगस्ट 2026 ते 31 जुलै 2027 या एका वर्षासाठी 25 लाख 12 हजार 786 रुपये खर्च करण्याचे प्रस्तावित आहे.तथापि काहींनी हि तरतूद अत्यंत अल्प असून यात अपेक्षित प्रसिद्धीच्या तुलनेत १५ टक्के प्रसिद्धी मिळू शकेल असाही दावा केला आहे .

दरम्यान प्रस्तावानुसार, महापौरांच्या दैनंदिन कार्यक्रमांसह बैठका, पाहणी दौरे आणि सार्वजनिक उपक्रमांची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नियुक्त केली जाणार आहे. यासाठी ‘रनटाइम सोल्युशन’ या एजन्सीची निवड करण्यात आल्याची माहिती आहे. या सेवेसाठी दरमहा सुमारे 2.09 लाख रुपये, तर दररोज जवळपास 6,900 रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.महापालिकेकडे जनसंपर्क विभाग आणि सोशल मीडिया यंत्रणा आधीपासूनच असताना स्वतंत्र एजन्सीची गरज का भासली, यावरून चर्चा सुरू झाली आहे. महापौरांच्या जनसंपर्कासाठी यापूर्वी काढण्यात आलेल्या निविदांवरही टीका झाली होती. आता सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी नव्या प्रस्तावामुळे या निर्णयाकडे लक्ष लागले आहे.

या प्रस्तावावर मनसेकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी महापालिकेने नागरिकांच्या पैशांचा वापर रस्ते, रुग्णालये, शाळा, स्वच्छता आणि इतर मूलभूत नागरी सुविधांसाठी करावा, अशी भूमिका मांडली. त्यामुळे महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी प्रस्तावित खर्चावरून आगामी काळात राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

5 मजली इमारतीला आग, 9 ठार:मृतांत बांगलादेशींचा समावेश, इमारतीत अनेक हॉटेल्स, 80 जणांची सुटका

कोलकात्यातील मिर्झा गालिब स्ट्रीटवरील एका पाच मजली इमारतीत मंगळवारी...

गणेशोत्सवाचे “वैश्विक अद्वितीय मुल्य” अधोरेखित करु या

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलारयांचे आवाहन मुंबई-आपला गणेशोत्सव हा...

जनतेच्या कामात भाजपा नेत्यांनी घातला खोडा, पण सुनेत्रावाहिनी, पार्थ दादांकडून निधी मिळवू-बालवडकर

कोथरूड मतदारसंघातील प्रभाग क्रमांक ९ च्या विकासकामांचा निधी रद्द-राजकीय...