युवा पिढीला मैदानी खेळाकडे आकर्षित करण्याची गरज -आबा बागुल
पर्वती चषक फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ
पुणे-
टेनिस बॉल क्रिकेटला सर्वाधिक पसंती असून क्रिकेट असा खेळ आहे कि ,ज्यामुळे एकात्मता जोपासली जाते असे प्रतिपादन आबा बागुल यांनी येथे केले.
पुणे शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने अखिल भारतीय काँग्रेस कमीटी च्या अध्यक्षा मा. सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पर्वती चषक फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटन उपमहापौर आबा बागुल यांच्या हस्ते झाले . यावेळी , स्पर्धेचे संयोजक व पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल ,नंदकुमार बानगुडे , सागर आरोळे,महेश ढवळे ,,प्रकाश आरणे सागर बागुल पप्पू देवकर योगेश बंगाले मनोज अवताड़े संतोष पवार सुयोग धाडवे सुरेश कांबळे राम रणपिसे , ,अभिषेक बागुल , धनंजय कांबळे ,समीर शिंदे ,इम्तियाज तांबोळी , आदी उपस्थित होते.
माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, भारत हा युवकांचा देश आहे. आजच्या डिजिटलायजेशन मुळे त्याचे मैदानी खेळाकड़े दुर्लक्ष होत आहे. या माध्यमातून या युवाकाला खेळाकड़े आकर्षित करण्यासाठी दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन केले जाते.
संयोजक अमित बागुल म्हणाले , सशक्त तरुण भारताला महाशक्ति होण्याकडे वाटचाल करेल त्यामुळे त्यांना खेळाकडे आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पहिला सामना सुपर इलेवन व अभिजीत क्रिकेट संघ यांच्यात रंगला. ही स्पर्धा 15 डिसेंबरपर्यंत होणार असून आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आल्याची माहिती अमित बागुल यांनी दिली.