पुणे- पद्मश्री अभिनेता ओम पुरी आणि मराठी चित्रपट एक अलबेला यांना ज्येष्ठ विचारवंत डॉ कुमार सप्तर्षी यांच्या हस्ते सलाम पुणे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .यावेळी साहित्यिक संजय सोनवणी, डॉ. दत्ता कोहिनकर , निकिता मोघे ‘एक अलबेला चित्रपटाचे दिग्दर्शक शेखर सरतांडेल ,अभिनेत्री राधा सागर ,चाटे शिक्षण समूहाचे फुलचंद चाटे , सलाम पुणे चे अध्यक्ष शरद लोणकर , वरिष्ठ पत्रकार अरुण लोणकर , निर्माता योगेश वणवे , मोहनकुमार भंडारी , अभिनेत्री भाग्यश्री देसाई ,अभिनेता बबलू राजपाल , मयूर लोणकर , वैभव पगारे,प्रशांत बोगम , विजयकुमार हरिश्चंद्रे, रवी सहाने , राजू घाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते . वरिष्ठ पत्रकार श्रीराम सहीने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले