नॉर्वे बॉलिवूड फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवणार मराठमोळा ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमा !

Date:

बहुप्रतिक्षित मराठी सिनेमा ‘मीडियम स्पाइसी’ नॉर्वे बॉलिवूड महोत्सवात प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला आहे. गेले १९ वर्ष हा बॉलिवूड महोत्सव साजरा केला जातो. यंदा ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमाचे वर्ल्ड प्रीमियर नॉर्वे मध्ये होणार आहे. ‌भारतात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी, या सिनेमाचे मुख्यतः पुण्यात आणि मुंबईतील काही ठिकाणी चित्रीकरण झाले. 
मोहित टाकळकर दिग्दर्शित, मीडियम स्पाइसी हा सिनेमा शहरी जीवनातील नातेसंबंध, प्रेम आणि लग्नसंबंधावर प्रकाश टाकणारा असल्याचे मानले जाते. यात सई ताम्हणकर, ललित प्रभाकर आणि पर्ण पेठे यांच्यासह सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता, तसेच ज्येष्ठ कलाकार नीना कुळकर्णी आणि रवींद्र मंकणी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.
लॅन्डमार्क फिल्म्सच्या निर्मात्या विधि कासलीवाल म्हणतात, “आम्ही प्रेक्षकांसाठी सिनेमा प्रदर्शित करण्याची वाट पाहत होतो. तर, आता नॉर्वेमध्ये ‘मीडियम स्पाइसी’चे पहिले स्क्रीनिंग करण्यासाठी आम्ही फार उत्सुक आहोत. खरंतर, कलेला सीमा नसतात; तसंच चित्रपट महोत्सव आपल्याला चित्रपटांद्वारे आपल्या कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत नेण्याची संधी देतात.”
नॉर्वेमध्ये चित्रपटाच्या प्रदर्शनाबद्दल मोहित टाकळकर म्हणतात, “एक दिग्दर्शक म्हणून, आमचा सिनेमा साता समुद्रापार चालला आहे हे बघून अत्यंत समाधान वाटतं. खरंतर जेव्हा आम्ही हा सिनेमा बनवला, तेव्हा या सिनेमाने त्याच्या प्रेक्षकांसाठी जास्तीत जास्त ठिकाणी प्रवास करावा अशी आमची इच्छा होती‌. माझ्या सिनेमाच्या टिमला आणि निर्मात्यांना आशा आहे की ‘मीडियम स्पाइसी’ सिनेमा महोत्सवात चांगलाच स्वाद आणेल ! ”
नॉर्वे बॉलिवूड फेस्टिव्हल हा अनेक प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांपैकी एक आहे. या महोत्सवात सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट आणि मनोरंजन उद्योगातील कलाकारांना त्यांच्या अद्भुत योगदानाबद्दल सन्मानित करतात. याआधीच्या महोत्सवात सलमान खान, विद्या बालन, हेमा मालिनी, अनिल कपूर, डेव्हिड धवन, मधुर भांडारकर आणि बोमन इराणीसारख्या काही कलाकारांनी हजेरी लावली होती.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

गावरान चिकन रस्सा ते बटेर थाळी, लसणाची चटणी ते बासुंदी-मांडे

महालक्ष्मी सरसच्या फूड कोर्टमध्ये खवय्यांसाठी मेजवानी; २५० रुपयांपासून थाळी...

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याकडून ‘महालक्ष्मी सरस’चे कौतुक

'उमेद'च्या उत्पादनांची चव आता थेट मंत्र्यांच्या किचनमध्ये! मुंबई: 'महालक्ष्मी सरस'...

महालक्ष्मी सरस मधून १ कोटी लखपती दीदी तयार करण्याचे उद्दिष्ट!

महिलांसाठी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल सुरू करणार ; मुख्यमंत्री...

शक्ती कायद्याची तत्काळ अमलबजावणी करा — रमेश बागवे

नसरापूर :आरोपीस फाशीचीच शिक्षा हवी— रमेश बागवेपुणे, दि. ४...