हुतात्मा चौकात लावणीचा मराठमोळा साज; ‘फुलवरा’च्या नायिकांची हुतात्म्यांना मानवंदना!

Date:

वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या लावणीसाजाने वेधले लक्ष; मकर संक्रांतीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध लोककला आणि मराठी अस्मितेचा सुंदर संगम मुंबईतील ऐतिहासिक हुतात्मा चौकात पाहायला मिळाला. आगामी ‘फुलवरा’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्री वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांनी पारंपरिक लावणीच्या वेशभूषेत हुतात्मा स्मारकाला भेट देत संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना मानवंदना दिली.

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशन्स निर्मित, रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ चित्रपटाचा फर्स्ट लूक टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्यामध्ये वैदेही आणि प्रियदर्शिनी यांचा मराठमोळा लावणीसाज पाहायला मिळाला. नऊवारी साडी, पारंपरिक दागिने, नजाकतदार अदाकारी आणि लावणीचा डौल यामुळे दोघींच्या नव्या भूमिकांची चर्चा रंगली आहे.

मराठी अस्मिता आणि लोककलेचा सुंदर संगम

संयुक्त महाराष्ट्राच्या ऐतिहासिक लढ्याचा साक्षीदार असलेला हुतात्मा चौक हा मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि संघर्षाचे प्रतीक आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शाहीर अमर शेख आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासारख्या कलावंतांनी आपल्या कलेच्या माध्यमातून जनजागृती केली होती. लावणी, तमाशा, शाहिरी आणि लोकनाट्य या कलाप्रकारांचेही या चळवळीत महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे.

या ऐतिहासिक स्थळाला वैदेही आणि प्रियदर्शिनी यांनी दिलेल्या भेटीतून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला उजाळा मिळाला.

मोठ्या पडद्यावर उलगडणार लावणी कलावंतांचे विश्व

लावणी ही केवळ नृत्यकला नसून तिच्या प्रत्येक अदाकारीत मराठी मातीचा ठसका, कलावंतांची मेहनत आणि परंपरेचा अभिमान सामावलेला आहे. ‘फुलवरा’च्या माध्यमातून लावणीच्या विश्वातील विविध रंग, कलावंतांचा संघर्ष आणि त्यांचा प्रवास मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे.

१४ जानेवारीला ‘फुलवरा’ चित्रपटगृहांत

रवी जाधव दिग्दर्शित ‘फुलवरा’ हा चित्रपट १४ जानेवारी २०२७ रोजी मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. वैदेही परशुरामी आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यासोबत आणखी कोणते कलाकार झळकणार आणि चित्रपटाची कथा नेमकी काय असणार, याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संभाजीनगरचा रस्ता खरेच मोकळा होणार की कारवाई ठरणार तात्पुरती? महापालिकेच्या भूमिकेकडे पुणेकरांचे लक्ष!

कात्रज, धनकवडी, सहकारनगर आणि बिबवेवाडी परिसरातील नागरिकांमध्ये अतिक्रमण कारवाईबाबत...

‘देश संविधानाने चालेल, मनमानीने नाही!’ नागपुरात CJP ची संविधान बचाव रॅली; अभिजीत दिपके यांचा केंद्र सरकारवर घणाघात

संविधान दिनी चार हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग असल्याचा आयोजकांचा...