Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नवी सांगवीमध्ये रॅम्बो सर्कस सुरू

Date:

 

जगप्रसिद्ध रॅम्बो सर्कस उद्योगनगरीतील नवी सांगवी परिसरात सुरू होत आहे. सर्कशीचा नवी संगवीच्या पीडब्ल्यूडी मैदान साई चौक, शुभारंभ आज रविवार दि. ८ मे २०१६ रोजी सात वाजता. संपूर्ण वातानुकुलीत तंबूत रॅम्बोचे सर्कस शो सादर केले जातात. रॅम्बो सर्कसला युरोपातील मोनॅको देशात मोन्टोकार्लो येथे मुख्यालया असलेल्या जागतिक सर्कस महासंघाचे सदस्यत्व मिळाले असून असा मान मिळवणारी आशिया खंडातील ती पहिलीच सर्कस आहे.

या सर्कसचे रोज दुपारी ४ आणि ७ असे दोन खेळ होणार असून, ४०० रूपये, ३०० रूपये, २०० रूपये, १०० रूपये असे तिकीट दर आहेत. तीन वर्षाखालील बालकांना मुक्त प्रवेश आहे. सर्कस प्रमींसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून अंध, अपंग व्यक्तींना विनामूल्य प्रवेश देण्यात येणार आहे. तिकीटांची ऑनलाइन व्यवस्था कऱण्यात आली असून bookmyshow.com तिकीटे उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच सर्कसच्या ठिकाणी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ऍडव्हान्स बुकींगची करता येईल.

सर्कसमध्ये यंदाही भारतीय कलाकारांसमावेत परदेशी कलावंत असून त्यात दक्षिण अमेरिका, रशिया, कोलंबिया, आर्मेनियम, नेपाळ, टांझानिया या देशातील कलाकारांचा समावेश आहे. सर्कसमध्य एकून ११० पुरूष व स्त्री कलावंतांचा समावेश असून सुमारे १५० अन्य कर्मचारी आहेत. त्यात मॅनेजर, डोअरकिपर, शिंपी, सुतार, लोहार, स्वयंपाकी इत्यादींचा समावेश आहे. सर्कसमध्ये बालगोपाळांचे विशेष आकर्षण असलेले ६ विदूषक आहेत. प्राण्यांमध्ये ४ हत्ती, १६ ऑस्ट्रलियन कुत्री, ३ घोडे, १ ट्टू आहे.

सर्कसमध्ये आकर्षक कलाविश्कार सादर केले जातात. त्यात लेझरमॅन, व्हील ऑफ डेथ, फ्लाईंगट्रॅपिज, बाऊन्सबॉल, जगलिंग, कंटोर्शन, ग्लायडर, ट्रीपल ट्रॅपिज, रोप बॅलन्सिंग, सायकलिंग, पिरॅमिडस, हट जगलिंग, सिल्क, तलवारीवर बॅलन्सिंग, शूटिंग स्कायवॉक, हायकप, रोलाबोला, डबलरिंग, कंटोर्शन जर्मन व्हील, फायर ऍक्ट, हत्ती क्रिकेट, डॉग शो, लूज वायर आदी कलाप्रकारांचा समावेश आहे. सर्कसमध्ये स्वतंत्र बॅँण्ड, अद्ययावत म्युझिक सिस्टिम, स्मोक मशिन, लेझर लाइटस असून ४२० फूट व्यासाचा प्रचंड वातानुकूलित तंबू आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...