पुण्याच्या व्यापाऱ्यांनी शासकीय आदेशाचा भंग करू नये – आयुक्त विक्रमकुमार (व्हिडीओ)

Date:

पुणे: राज्य सरकार व पुणे महापालिका प्रशासनाने नव्याने लागू केलेल्या लॉकडाऊन नियमावलीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. या निर्णयाविरोधात व्यापारी वर्गाने आज निदर्शने केली त्यानंतर उद्या दुकाने उघडण्यात येतील असे जाहीर केले आहे यावर महापालिकेचे आयुक्त डॉ.विक्रम कुमार यांनी व्यापारी वर्गाला शासकीय आदेशाचा भंग करू नये अशी विनंती पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे . त्याच बरोबर शासकीय आदेशाचा भंग करणांवर पोलीसांकरवी कारवाई होऊ शकते असेही म्हटले आहे.

राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत दुकाने बंद ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात आज पुणे व्यापारी महासंघाने विजय टॉकीज ते क्वार्टर गेटपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा व्यापारी सदस्य निषेधाचा फलक सोबत दंडावर काळी फित लावून निषेध नोंदवला असून शुक्रवारी (दि. ८) सकाळी साडे आठ वाजता दुुकाने उघडणार आहे. यावेळी पोलीस किंवा प्रशासकीय अधिकारी यांना जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी अशा शब्दात खुले आव्हान दिले आहे.

मात्र या भूमिकेविरोधात महापालिका आयुक्त डॉ. विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करताना व्यापारी वर्गाला सरकारी आदेशाचे पालन करण्याची विनंती केली आहे.

पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच महापालिका व आरोग्य विभाग प्रशासन कोरोना विरुद्धच्या लढाईत युद्धपातळीवर कार्यरत आहे.मात्र, वेळप्रसंगी आणखी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊ, पण कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही, असा दावाही पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ.विक्रम कुमार यांनी केला आहे.विक्रम कुमार म्हणाले,बाणेर येथील इएसआय रुग्णालय ताब्यात घेणार असून १३० बेड्स कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरात येणार आहे. तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये बेड वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढील पाच दिवसांत ५० व्हेंटिलेटर वाढवणार आहोत. आता एकूण ४०० ऑक्सिजन बेड शिल्लक असून आणखी ३५० बेड्स पुढील ३ते ४ दिवसात उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.शहरातील आणखी ६ खासगी रुग्णालय कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करू, पण कुठल्याही परिस्थितीत कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड्स कमी पडू देणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी जास्तीत जास्त हॉस्पिटल ताब्यात घेतले जातील. सध्या शिवाजीनगर येथील जम्बो रुग्णालयात ८००पैकी ६००बेड्स कार्यरत आहेत. तसेच ५० ऑक्सिजन व ३० व्हेंटिलेटर उपलब्ध आहे.आजमितीला शहरात महापालिकेकडे कोरोना प्रतिबंधक लसींचे एकूण २५ हजार खासगी रुग्णालयांकडे ४५ हजार डोस शिल्लक आहे. तसेच विविध ठिकाणी एकूण १२५ केंद्र सुरू आहे. दररोज २० ते २२ हजार लोकांना लसींचा डोस दिला जात आहे. मागील ३० दिवसांत ५ लाख लोकांना लस देण्यात आली आहे अशी माहिती विक्रम कुमार यांनी यावेळी दिली. होम आयसोलेशन रुग्णांनी घरी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे.शहरात आज २००० तर उद्या आणखी जास्त रेमीडिसिव्हर औषधांचा साठा उपलब्ध होणार आहे.त्यामुळे रेमीडिसिव्हर चा निर्माण झालेला तुटवडा भासणार नाही.पुणे महापालिकेचे कॉल सेंटरकडे खासगी संस्थेकडे चालवायला देण्यात येणार आहे. दररोज ५००फोन येत असून १५ हेल्प लाईन कार्यरत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...