सरकारने किती खटले दाखल करायचे ते करावेत – एफ.एम रांका (व्हिडीओ)

Date:

पुण्याचे व्यापारी करणार दुकाने उघडून सरकारी आदेशभंगाचा सत्याग्रह

पुणे- कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने 30 एप्रिल पर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध करत पुण्यातील व्यापाऱ्यांनी आज लक्ष्मी रस्त्यावर काळ्या फिती लावून आंदोलन केले आहे. व्यापाऱ्यांनी लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज ते नाना पेठेतील क्वार्टर गेट पर्यंत सहा फुटांचे अंतर ठेवत साखळी करण्यात आली होती.आता उद्यापासून 10 ते सायंकाळी साडेपाच वाजे पर्यंत दुकाने उघडून महापालिका आयुक्तांच्या आदेशाचा भंग करून सत्याग्रह करणार असल्याचे व्यापाऱ्यांनी यावेळी जाहीर केले. मात्र विभागीय आयुक्त सौरव राव यांनी जाहीर केलेल्या आदेशाप्रमाणे कोरोना मुक्तीसाठी आचरणाचा निर्णय घेण्यात आला असून शिनिवार आणि रविवार अशा दोन्ही दिवशी दुकाने बंद ठेवण्यात येतील सोमवारपासून पुन्हा सुरु करण्यात येतील . सरकारने काय खटले दाखल कार्याचे ते करावेत असे आव्हान हि यावेळी व्यापाऱ्यांनी दिले . फत्तेचंद रांका आणि मान्यवर व्यापरी यांनी आजच्या या निदर्शनाचे नेतृत्व करत सरकारी आदेशां विरुद्ध रणशिंग फुंकले आहे .

व्यापाऱ्यांनी यावेळी दुकाने बंद ठेवण्याचा निषेध करत मेरा पेट, मेरी मजबुरी, दुकान खोलना हे मजबुरी यासारखे फलक हातात घेऊन झळकावले होते. सकाळी 11 वाजता सुरू झालेल्या या आंदोलनात दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह व्यापारीही पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सहभागी झाले होते.या आंदोलनात पुणे व्यापारी महासंघाचे संलग्न असणाऱ्या शहरातील 82 संघटना सहभागी झाल्या होत्या. पुणे शहरात किरकोळ आणि घाऊक अशी जवळपास 40 हजार दुकाने बंद आहे. शहरातील मध्यवर्ती परिसरात असणाऱ्या मंगळवार पेठ, नाना पेठ, कसबा पेठ, शुक्रवार पेठ, गुरुवार पेठ, शिवाजी रस्ता येथील इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक, कॉम्पुटर, सायकल, केमिकल, ऑटोमोबाईल, पेपर प्लास्टिक यासारखे संपूर्ण दुकाने बंद आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...