पुणे- राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येत नाही , राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो किंवा मित्रही नसतो ..अशी अनेक वाक्ये आपण नेहमी ऐकतो आणि त्याची प्रचीती हि घेत असतो .
विशेष म्हणजे इथे असे काहीही घडलेले नसताना देखील . भाजपचे खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले आणि राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण हे तिघे पुणे स्टेशन वर महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करताना एकत्र दिसले .खरे तर हा योगा योगाचा भाग .महात्मा गांधींच्या जयंती निमित्त राष्ट्रवादीचे अभिवादन आणि आंदोलन इथेच .. आणि तत्पूर्वी भाजपकडून गांधीजीना अभिवादनाचा कार्यक्रमही इथेच होता .
अगोदर भाजपचा कार्यक्रम होता .. तो सुरु झाला तेव्हा म्हणजे, राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाच्या वेळेवर वंदना चव्हाण इथे आल्या होत्या .पण राष्ट्रवादीचे इतर नेते यायचे होते . आणि भाजपचे देखील पालकमंत्री ,महापौर देखील येणार होते .पण या तिघांनी आजच्या दिवशी पुतळ्याला प्रथम पुष्पहार घालण्याचा मान मिळविला … आणि विशेष म्हणजे ..भाजपचे खासदार अनिल शिरोळे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना महात्मा गांधींचे स्वप्न देशातील १२८ कोतो लोक पूर्ण करू शकतात आणि त्यांच्यात जागृती करण्यासाठी म. गांधींचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कार्यक्रम घेत आहोत असे सांगितले.
भाजप आणि राष्ट्रवादी चे खासदार आले एकत्र -महात्मा गांधींना पुष्पमाला घालण्यासाठी(व्हिडीओ)
Date: