Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

नको त्याला मोकाट सोडायचं आणी नको त्याला पकडायचं – यापेक्षा पारदर्शक कारभार करा -खा. सुळे (व्हिडीओ)

Date:

पुणे- ज्याच्यावर आरोप आहेत त्याला मोकाट सोडायचं आणि ज्याच्यावर नाहीत त्याला जेल मध्ये टाकायचं अशी कार्यपद्धती  राबविणाऱ्या फडणवीस सरकारने पारदर्शक कारभार करावा अशी प्रतिक्रिया संभाजी भिडेंवरील गुन्हे मागे घेतल्याप्रकर्णी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली तर  राफेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वो शरद पवार यांची मुलाखत मराठीत झाली .आणि मराठी समजणाऱ्यास ती समजली .अलीकडे अभ्यास न करता ,निव्वळ ब्रेकिंग न्यूज आणि हेडलाईन पाहून मते ठरविली जातात ते चुकीचे आहे राफेल प्रकरणी राष्ट्रवादी ची  भूमिका ठाम आहे असे स्पष्टीकरण  खासदार सुप्रिया सुळे-पवार यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यातील अनेक भागात महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत भाजप सरकारच्या विरोधात मौनव्रत धारण करत तोंडाला काळ्या पाट्या बांधून जवाब दो आंदोलन करण्यात आले .  पुणे स्टेशन येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या .

“सरकारमधील जबाबदार व्यक्ती महिलांना उचलून नेण्याची भाषा करतो तेव्हा सरकारकडून विशेषतः गृहमंत्रालयाने महिलांच्या सुरक्षेततेवर काही तरी बोलावं अशी अपेक्षा होती.तसे कुठलही विधान आलेल नाही.त्यामुळे सध्या देशात जो कारभार सुरू आहे, त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात प्रचंड असंतोष आहे” असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. पुण्यातील कालवा फुटी प्रकरणी जबाबदारी न घेता सत्ताधारी दुसऱ्यावर जबाबदारी ढकलुन देत आहेत. असा आरोप सुद्धा सुळे यांनी केला.

भिडे गुरुजी यांच्यावरील गुन्हे मागे घेतले यावर बोलताना सरकार ज्यांच्यावर आरोप नाहीत त्यांना नजरकैदेत ठेवतात आणि ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना मोकाट ठेवतात.हे सातत्याने आपण राज्यात पाहतोय हे दुदैव आहे. मुख्यमंत्र्यांचा आवडता शब्द आहे पारदर्शकता. तर मग मुख्यमंत्र्यांनी पारदर्शक कारभार करावा असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जास्तीत जास्त भूभागावर वीज अटकाव यंत्रे बसवा-डॉ. नीलम गोऱ्हे

छत्रपती संभाजीनगर, दि.१६ - पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विजा कोसळून...

श्री तुळशीबाग महागणपतीला १५०० कलिंगडांचा नैवेद्य 

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट...