पुणे फेस्टिव्हलमध्ये आज बालगंधर्व रंगमंदिर येथे मनीषा अभय
संचलित, सुकृति कथ्थक डान्स अकॅडमीतर्फे ‘शिवतांडव’ ही नृत्यसंरचना सादर
करण्यात आली. शिवाच्या 7 तांडवांची ही अनोखी प्रस्तुती होती. प्रत्येक तांडवाची
एक कथा आणि त्या अनुषंगाने नर्तन सादर करण्यात आले. तांडव म्हणजे केवळ
रौद्र नर्तन नव्हे तर, पार्वतीच्या लास्य अंगाचाही त्यात समावेश होतो. कालिका
तांडव द्वारा शिवाच्या अष्टद्विकपालांचे नर्तन व विराट रूपाचे दर्शन झाले, तर
संहार म्हणजे दुष्ट वृत्तीचा नाश व सृजनाची सुरूवात. नवीन तर्हेनी केलेली संगीत
संरचना व अत्यंत उर्जात्मक नर्तन याने ‘शिवतांडव’सजले. प्रेक्षकांनी यास मोठा
प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात गुरु मनीषा अभय यांसमवेत सिद्धी अभय, विनया
महेश, श्रद्धा रांजेकर, कल्याणी कुलकर्णी, रेवा जोशी, सही जाधव हे सहकलावंत
सहभागी झाले होते. याचे निवेदन मधुर ओक यांनी केले. पुणे फेस्टिव्हलचे मुख्य
संयोजक कृष्णकांत कुदळे यांच्याहस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. पुणे
फेस्टिव्हलचे बालगंधर्व रंगमंदिर प्रमुख श्रीकांत कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास एबीआयएल आणि गेरा ग्रुप हे प्रायोजक होते.
पुणे फेस्टिव्हलमध्ये ‘शिवतांडव’कथ्थक नृत्य सादर
Date: