पुणे फेस्टिव्हलमध्ये मध्यप्रदेशच्या भोपाळ येथील ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना अनुराधा सिंग
यांनी बालगंधर्व रंगमंदिर येथे’बंदिश’; हा कथ्थक नृत्याविष्कारावर आधारित कार्यक्रम सादर करून रसीक
प्रेक्षकांची मने जिंकली. प्रथम त्यांनी तोरी रागावर, सुलफथ्था ताल याआधारे नृत्यास प्रारंभ केला. पाठोपाठ
विविध छंदांचे अविष्कीकरण करणारी तीन तालातील घुंगरू बंदिश सादर केली. रायगर घराण्याची कथ्थक
परंपरा जोपासणारे वेगवान निखळ कथ्थक त्यांनी चापल्यपूर्णतेने सादर केले. राग मिया मल्हारमध्ये
"बरसन लगी बदरिया सावन की’; हे तीन तालातील आणि राग शिवरंजनी यावर आधारित नेत्रदिपक
कथ्थक नृत्याविष्कार त्यांनी सादर केला. कालिया मर्दानची कथा विषद करणारे राग हंसध्वनीमधील
नृत्याविष्कार त्यांनी सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. त्यामध्ये घुंगरूसह तबला आणि व्हायलिनची
जुगलबंदी प्रेक्षकांची दाद मिळवून गेली. शेवटी त्यांनी कलावती रागामध्ये ‘मोहे छेडो ना’ या राधा-कृष्ण
यांच्या प्रेमकथेवर आधारित नृत्याविष्कार सादर केला.
कथ्थक नृत्यांगना अनुराधा सिंग यांचे देश-विदेशात कथ्थक नृत्याचे अनेक कार्यक्रम झाले असून
देशातील अनेक सांस्कृतिक महोत्सवांमध्ये त्यांचे विशेष कथ्थक नृत्याचे कार्यक्रम झाले आहेत. पुणे
फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक कृष्णकांत कुदळे यांच्याहस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पुणे फेस्टिव्हलचे
बालगंधर्व रंगमंदिर प्रमुख श्रीकांत कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास एबीआयएल आणि गेरा ग्रुप हे प्रायोजक होते.
भोपाळचे अनुराधा सिंग यांचे कथ्थक नृत्य सादर
Date: