अनुसूचित जाती उपयोजनेतर्गेत शेतावर मृद व जलसंधारणाचे उपचारासाठी योजना

Date:

पुणे, १९- जिल्हा वार्षिक योजनेमधून अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत (विशेष घटक योजना) अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या शेतावर मृद व जलसंधारणाचे विविध उपचार राबविण्यासाठी पुणे जिल्ह्यास एक कोटी वीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.

अनुसूचित जातीमधील शेतक-यांना उत्पन्नाचे इतर कायम स्वरुपी साधन नसते, त्यांचे संपूर्ण क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठीच्या मर्यादा लक्षात घेता  कृषि उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषि विभागातर्फे पाणलोट विकास कार्यक्रम राबण्यात येत आहे.

अनुसूचित जातीच्या शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ करुन त्यांचे राहणीमान सुधारणे व त्यांचे स्थलांतर रोखणे यासाठी हि योजना १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येत  आहे. या योजनेतंर्गत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांची संमती घेऊन त्यांच्या वैयक्तीक क्षेत्रावर मृद व जलसंधारणाचे सलग समतल चर, कंपार्टमेंट बंडीग, अनघड दगडी बांध, शेततळे, मजगी, जुने भात शेती दुरुस्ती इ. व सामुहीक स्वरुपाचे माती नाला बांध, सिंमेंट नाला बांध इ. उपचार घेण्यात येतात.

या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जातीचा दाखला , ७/१२ उतारा व ८ अ चा उतारा इ. कागदपत्र देणे आवश्यक आहे. या योजनेचा लाभ घेऊ  इच्छित असलेल्या शेतक-यांनी कृषि विभागाच्या तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायक तसेच उपविभागीय कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पुणे यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तळजाईच्या नसात पसरतोय काँक्रीटचा कॅन्सर ! अधिकाऱ्यांच्या संमतीने निसर्गाचा खून, आयुक्त-जिल्हाधिकारी गप्प!

उघड्या डोळ्यांनी पुणेकर पाहताहेत तळजाईची ही दुर्धर अवस्था… विशेष शोधनिबंध...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये – गोपाळदादा तिवारी

एमपीएससी परीक्षा ऑफलाइन घेण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीला कॉँग्रेसचा पाठिंबा ..!आंदोलना...

“५४ कोटी खर्चूनही परांडे नगर पाण्यात; प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश

वडगावशेरीतील पावसाळी परिस्थितीची पाहणी; धानोरीतील सदोष कामांवर कारवाईचे आदेश ५४...

झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंगला IPO साठी सेबीची मंजुरी

12 हजार कोटींच्या ऑर्डर बुकसह बाजारात उतरणार; ऊर्जा, संरक्षण,...