पुणे-कर्वेनगर वारजे क्षेत्रीय कार्यालयातील आधार कार्डचे मशीन गेल्या १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी पासून बंद असून येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.याप्रकरणी तातडीने शासनाने दाखल घेवून कार्यवाही करावी अशी मागणी भाजपचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी केली आहे .
या प्रकरणी त्यांनी म्हटले आहे ,’संगणकप्रणालीच्या उन्नतीकरणासाठी सध्या मशीन बंद असल्याचे तेथील यंत्रचालक (ऑपरेटर ) सातत्याने सांगत होते व मी व्यक्तिशः त्यावर विश्वास ठेऊन दिवसाआड फोन करत होतो.मात्र माझ्या कुटुंबियांचे आधार कार्ड मोबाईल शी जोडण्याचे (लिंक करण्याचे) काम लवकर केल्यास आयकराची पडताळणी (इन्कम टॅक्स रिटर्न्स चे व्हेरिफिकेशन ) ऑनलाईन करणे सोयीस्कर होते असे माझे वित्तीय सल्लागार सातत्याने सांगत होते.म्हणून मी कलेक्टर कचेरीतील आधार चे काम बघणारे तहसीलदार विलास भालेराव यांना संपर्क केला असता ” असे कोठे मशीन बंद असल्याचे आम्हास माहिती नाही ” असे त्यांनी सांगितले तर क्षेत्रीय अधिकारी गणेश सोनुने म्हणाले ” कि हे काम आमच्या अखत्यारीत येत नाही “. त्यानंतर श्री भालेराव यांच्या मार्गदर्शनानुसार मनपा तील सदर काम बघणारे श्री पानसे (mobile 9921678198) यांच्याशी संपर्क साधला असता सत्य परिस्थिती समजली. येथील यंत्रचालकास काही कारणास्तव ब्लॉक करण्यात आले असून आम्ही यु आय डी ला कळविले आहे व लवकरच हे मशीन चालू होईल असे ते म्हणाले.
मात्र या सगळ्यात प्रशासनाचा भोंगळ कारभार निषेधार्य असून माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून दिले जाणारे आधार किट /मशीन जुने असून अनेक ठिकाणी त्यांची दुरुस्ती व उन्नतीकरण करावे लागते व मोठ्या प्रमाणावर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती असल्याचे ही एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले.तरी या प्रकरणात महाऑनलाईन ने त्वरित सुधारणा करावी अशी आग्रही मागणी करत आहे,