पुणे-हडपसर येथील म्हाडा काॅलनीमध्ये काही गुंडानी मिळून वाहनांची तोडफोड केली आहे. गुंडांच्या या हल्ल्यात काही लोक जखमी झाले आहेत. या तोडफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तोडफोड करणारे गुंड हे एका खून प्रकरणात जामीन मिळवून नुकतेच बाहेर पडले आहेत. त्यानंतर परत असे कृत्य करणे म्हणजे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न असून या प्रकरणात पोलिसांनीही पुरेसे लक्ष घातले नाही, असा आरोप करीत परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हडपसर मध्ये पूर्ववैमस्यातून गुंडांच्या टोळक्याने एकाला जबर मारहाण करत परिसरात दहशत माजवून चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी वाहनांची तोडफोड केली. दरम्यान या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली असून लहान मुले आणि महिलांची आपला जीव वाचवण्यासाठी धांदल उडाली. याप्रकरणी 326, गाड्याची तोडफोड आणि तसेच दहशत माजवणे याप्रमाणे हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही.