Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

माणूस एक माती ! …..विचार बदलायला लावणारा चित्रपट !

Date:

सध्या मराठी चित्रपटांच्या विषयात आणि आशयात खूप विविधता दिसून येत आहे आणि या चित्रपटांची नावं सुद्धा खूप वैविध्यपूर्ण असून, ‘माणूस एक माती’ हा असाच एक नाविन्यपूर्ण नाव असलेला चित्रपट ! २४ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘माणूस एक माती !’ या आगामी चित्रपटाच्या प्रगल्भ नावाप्रमाणे चित्रपटाचा आशय देखील प्रगल्भ आहे ! प्रत्येक माणसाची शेवटी माती होते, हे जरी खरं असलं तरी, जर जिवंतपणीच आयुष्याची माती झाली तर ?

‘शिवम ऐनटरटेंमेंन्ट इंडिया लिमिटेडच्या’,निर्माती शारदा विजयकुमार खरात, सह निर्माते डॉ विजयकुमार खरात, दिलीप निंबेकर आणि कार्यकारी निर्माते देवा पांडे हे कायमच आशयघन कलाकृतीला महत्त्व देतात. त्यामुळे ‘माणूस एक माती’ सारख्या प्रगल्भ सामाजिक विषयाला त्यांनी उचलून धरले आणि लेखक-दिग्दर्शक सुरेश झाडे यांनी हा विषय अतिशय कल्पकतेनं मांडला आहे. चित्रपटाची कथा सुरेश झाडे यांची असून पटकथा आणि संवाद सुरेश झाडे आणि राजू सपकाळ या द्वयींची आहे.

उर्जेचा स्त्रोत असलेल्या सिद्धार्थ जाधवचा ‘बाप अभिनय’ आणि चित्रपटातील त्याचा बाप गणेश यादवचाही ‘बाप अभिनय’ म्हणजे प्रेक्षकांना एक पर्वणी असणार आहे. रुचिता जाधव, स्वप्नील राजशेखर, हर्षा गुप्ते, डॉ विलास उजवणे, वरद चव्हाण, किशोर महाबोले व जगन्नाथ निवंगुणे  यांनी सुद्धा आपापल्या भूमिका सुंदरपणे साकारल्या आहेत.  चित्रपटातील गाणी प्रशांत हेडाऊ यांनी लिहिली असून चित्रपटाला संगीत सुद्धा त्यांनीच दिले आहे. ही श्रवणीय गाणी स्वप्नील बांदोडकर, डॉ नेहा राजपाल, आदर्श शिंदे, बेला शेंडे, शिना अरोरा, पी गणेश  यांनी आपल्या सुरेल आवाजात गायली आहेत.

 

‘आई’ या विषयावर बरचं लिहिलं, बोललं आणि ऐकलं गेलं आहे परंतू बाबाचं, न दिसणारं हळुवार मन अत्यंत सुंदरपणे उलगडत नेणारा ‘माणूस एक माती’ हा एक उच्च निर्मिती मूल्य असलेला कौटुंबिक-सामाजिक चित्रपट आहे. कुटुंब व्यवस्था, नाते संबंध यांची महती सांगणारा हा चित्रपट म्हणजे कुटुंबाने एकत्र बसून बघण्यासारखा एक हृदयस्पर्शी अनुभव असेल. शिवाय या चित्रपटाचे नाव आपल्याला बरच काही सांगत आहे आणि २४ मार्चला प्रदर्शित झाल्यावर चित्रपट सुद्धा आपल्याला बरचं काही सांगणार आहे !

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन शिक्षेत वाढ:सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या विधेयकाचे झाले काय?

दारूबंदी सुधारणा विधेयक 2025 घेतले मागे... मुंबई-सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून...

दारुबंदी विधेयक सुधारणेसाठी सभागृहात आमदार महेश लांडगे यांनी मांडली आक्रमक भूमिका

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांचे सर्वंकष उपाययोजनांचे निर्देश मुंबई/ पिंपरी-चिंचवड...

चाकूर च्या माजी नगराध्यक्षांसह शरद पवार गट, ‘प्रहार’ च्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले स्वागत मुंबई, 11 जुलै...

साक्षीभावात राहिल्यास जीवनातला प्रत्येक क्षण आनंददायी : अभयकुमार सरदार

‌‘निसर्गातील कार्यक्षमता‌’ विषयावर अनोखे चित्रप्रदर्शन पुणे : साक्षीभाव साध्य झाल्यास...