पुणे-गुंतवणूकदारांना १ ते ५ टक्के मासिक व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी वॅलेंटीना इंडस्ट्रीजच्या दोन संचालकांविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने त्यांच्या कार्यालयावर आणि निवासस्थानी छापेमारी करत महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. प्राथमिक तपासात फसवणुकीचा आकडा ४३ कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.संतोष नाथा बांदल Santosh Natha Bandal (रा. गिडणी पार्क, सॅलिसबरी पार्क)आणि ज्ञानेश्वर अनंत चोरगे Dnyaneshwar Anant Chorge (रा. लेकटाऊन सोसायटी, बिबवेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संचालकांची नावे आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने ९ महिने गोपनीय चौकशी करुन स्वत: पुढाकार घेऊन ही कारवाई केली आहे.याबाबत सहायक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.बड्या राजकीय आणि प्रशासकीय हस्ती,बडी प्रसारमाध्यमे यांच्याशी कायम संबधित राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. बड्या प्रसार माध्यमांच्या इव्हेंट ला स्पॉन्सर शिप देणे मुख्यमंत्र्यांपासून ते असंख्य सिलेब्रिटी समवेत कार्यक्रम करणे, यासह मोठी डामडौल या कंपनीची कायम दिसत आली आहे. त्यांचे कार्यालय Success Square, Office No 301, 3rd FloorKarve Statue Chowk, Karve Road Pune, Maharashtra, 411038 येथे आहे.
आरोपींनी एकूण १५ कंपन्या दाखविल्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आकर्षक योजना तयार केल्या होत्या. कागदोपत्री १ टक्का, तर प्रत्यक्षात ५ टक्के परतावा देण्याचे खोटे आमिष दाखवून त्यांनी गुंतवणूकदारांकडून तब्बल ४३ कोटी २० लाख रुपयांच्या ठेवी स्वीकारल्या.जुलै २०२२ ते एप्रिल २०२६ या कालावधीत हा प्रकार घडला. गुंतवणूकदारांना परतावा आणि मुद्दल देणे बंद केल्याने अनेकांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी केल्या. या तक्रारींच्या आधारे अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. शासनातर्फे अनियमित (अनधिकृत) ठेवी योजना बंदी कायदा, २०१९ च्या कलम २१ अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात, पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त विवेक मासाळ यांनी सांगितले की, “गुन्हा दाखल झाल्यानंतर बांदल आणि चोरगे यांच्या कार्यालयावर व राहत्या घरी झाडाझडती घेण्यात आली. प्राथमिक चौकशीत किमान दोन हजार गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे. त्या अनुषंगाने आमचा तपास सुरू आहे.”


बड्या बड्या प्रसार माध्यमातून जाहिराती द्वारे , कार्यक्रमांतून बड्या हस्तीकडून या कंपनीच्या संचालकांचे कायम कौतुक झाले आहे तरीही असा गुन्हा दाखल झाल्याने त्यांचे काही हितचिंतक गुन्हा दाखल झाल्याच्या बातमीवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

