विधान परिषदेसाठी सुनेत्रा पवारांना रुपाली पाटलांनी घातले साकडे

Date:

पुणे-राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे यांनी विधानपरिषदेवर संधी मिळावी, अशी अधिकृत मागणी पक्षाकडे केली आहे. त्यांनी यासंदर्भात उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. विधान परिषदेत सक्षम आणि लढाऊ महिला प्रतिनिधीची गरज असल्याचे सांगत त्यांनी आपली दावेदारी प्रबळ असल्याचे ठामपणे मांडले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस 30 एप्रिल 2026 असणार आहे. 2 मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख 4 मे आहे. तर 12 मे रोजी मतदान होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजेनंतर निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे यांनी उमेदवारी देण्याची मागणी केली आहे.

रूपाली ठोंबरे यांचे पत्र जशास तसे

रूपाली पाटील ठोंबरे आपल्या पत्रात लिहितात की, मी अॅड. रूपाली पाटील ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निष्ठावंत कार्यकर्ती म्हणून मागील अनेक वर्षांपासून मा. अजित पवार दादा यांच्या नेतृत्वाखाली सक्रियपणे कार्यरत आहे. तसेच माझी राजकीय कारकीर्द मागील वीस वर्षांची असून या काळात मी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्यांने लढा दिला आहे.
माजी नगरसेविका व शहर सुधारणा समिती अध्यक्षा म्हणून काम करताना मी प्रशासनावर प्रभावी पकड ठेवून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. पुणे महानगरपालिका तसेच पदवीधर निवडणुका लढविताना मला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे, ज्यातून माझे जनाधार व संघटन कौशल्य मी सिद्ध केले आहे.

मला सभागृहाचे नियम, प्रक्रिया व कामकाजाचे सखोल ज्ञान असून, मी प्रश्न मांडणे, शासनाला जबाबदार धरणे व जनतेच्या मुद्यांवर ठाम आणि आक्रमक भूमिका घेणे यात पारंगत आहे. एक महिला लोकप्रतिनिधी म्हणून मी नेहमीच अन्यायाविरोधात ठामपणे उभी राहिले आहे आणि समाजातील दुर्बल घटकांसाठी प्रभावी आवाज बनले आहे. आज पक्षाला अशा अभ्यासू, लढाऊ व निष्ठावंत महिला नेतृत्वाची गरज आहे, जी सभागृहात पक्षाची भूमिका ठामपणे मांडू शकेल आणि जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देईल. त्या दृष्टीने मी स्वतःला सक्षम उमेदवार म्हणून आपणासमोर उमेदवारीची मागणी करत आहे.

म्हणून आपणास नम्म्र विनंती आहे की, माझ्या कार्याचा व अनुभवाचा विचार करून मला विधानपरिषदेवर संधी द्यावी, ही नम्र विनंती, असे रूपाली पाटील यांनी पत्रात लिहिले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.