बनावट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) परवानग्यांच्या आधारे उंच इमारती उभारल्या- शिवसेनेचा आरोप

Date:

पुणे- शहरात काही महापालिकेच्या वर्षापूर्वी बोगस गुंठेवारी दाखल्याचे प्रकरण गाजले होते पण तरीही ते हलक्यात घेतले असताना आता त्यावर कोणाचे नियंत्रण उरलेले एकीकडे दिसत नाही अशा पार्श्वभूमीवरच बनावट एअर ट्रॅफिक कंट्रोल (एटीसी) परवानग्यांच्या आधारे उंच इमारती उभारल्याचा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे विमान अपघाताचा धोका निर्माण झाला असून, विकासक आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे. शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या प्रकरणी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विकासक आणि महापालिकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी संगनमताने हे बनावट परवाने मिळवून इमारतींना मंजुरी दिल्याचे समोर आले आहे. शहरातील आंबेगाव, बिबवेवाडी आणि सिंहगड रोड परिसरातील उंच इमारतींच्या मंजुरीमध्ये अनियमितता असल्याचा आरोप आहे.

एअर फोर्सच्या गांधीनगर कार्यालयाने महापालिकेला कळवले आहे की, आंबेगाव येथील एका प्रकल्पासाठी सादर केलेली परवानगी ‘पूर्णपणे बनावट’ आहे. लष्करी अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून हे परवाने मिळवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

याबाबत शिवसेनेचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर यांना निवेदन दिले आहे. ६ एप्रिल रोजी पुरावे देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप घरत यांनी केला. एनडीए आणि मिलिटरीची संवेदनशील ठिकाणे पुण्यात असताना, सुरक्षिततेचे नियम पायदळी तुडवणे हा राष्ट्रद्रोहाचा प्रकार असल्याचे घरत यांनी म्हटले आहे.

खासदार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. भ्रष्टाचाराच्या या इमारतींना तात्काळ टाळे ठोकून दोषी अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, असा इशाराही घरत यांनी दिला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हिंजवडी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी हाय पॉवर कमिटीची पहिली बैठक संपन्न

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ४२६ कोटींचा निधी...

बजाज फिनसर्व्हच्या अत्याधुनिक मुख्यालयामुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळेल-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यातील वाहतूक व्यवस्था वेगवान करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त पुणे, दि....

खळबळजनक! कोर्ट सुरू असतानाच अंबाजोगाईच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीशांना सक्तीची सेवानिवृत्ती

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बीडच्या प्रमुख जिल्हा न्यायाधीशांच्या पथकाकडून...