श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य

Date:

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव

पुणे :
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीने पारंपरिक उत्साहात ‘आंबा महोत्सव’ साजरा करण्यात आला. यावेळी बाप्पाला ७ हजार आंब्यांची आकर्षक आरास करुन महानैवेद्य दाखविण्यात आला. तसेच यानिमित्ताने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली असून बाप्पांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत आहे.

महोत्सवाच्या निमित्ताने सकाळची आरती बी. यू. भंडारी ग्रूपचे चंद्रवर्धन भंडारी व उल्हास घाटगे यांनी सपत्नीक तसेच चिवडेवाले रामचंद्र भगवानदास यांच्या हस्ते भक्तिभावाने पार पडली. यावेळी उपस्थित भाविकांनीही आरतीत सहभागी होत मंगलमय वातावरणाचा अनुभव घेतला.

आंबा महोत्सवासाठी यंदा तब्बल ७ हजार आंब्यांचा वापर करून बाप्पांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या आंब्यांनी सजवलेले गणरायाचे रूप भाविकांचे विशेष आकर्षण ठरत असून, दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रांग लागलेली पाहायला मिळत आहे. बाप्पाच्या सजावटीसाठीचे आंबे शहरातील विविध अनाथ आश्रमात वाटप करण्यात येणार आहेत.

दरम्यान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही हा महोत्सव उत्साहात साजरा केला जात असून, पुणेकर भक्तांमध्ये या सोहळ्याबद्दल मोठी उत्सुकता दिसून येत आहे. यावेळी ट्रस्टचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.


‘हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असल्याने श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या बाप्पावर पुणेकरांसह संपूर्ण राज्यातील भाविकांची विशेष श्रद्धा आहे. आज अक्षय तृतियेनिमित्त बाप्पाला ७ हजार आंब्यांचा आरासरुपी दाखवलेला केवळ महानैवेद्य नसून मानवतेचीही पूजा आहे. कारण हे सर्व आंबे शहरातील विविध आश्रमात वाटप करण्यात येणार आहेत. बाप्पाचा भाविक म्हणून आमच्या सर्वांसाठीच हे अत्यंत पवित्र कार्य असून आमच्या हातून ते असंच वाढत जावो, ही बाप्पाच्या चरणी प्रार्थना’’.
पुनीत बालन
(उत्सवप्रमुख, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘नोटसम्राट 2 – नोटबंदीचा लढा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील प्रश्नांची जाणीव आहे. त्यांनी...

शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर:उद्योगमंत्री उदय सामंत; धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन

पुणे: "सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी त्यांना मदतीचा हात...

मुंबई युवक काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

“गिग वर्कर्स न्याय अभियान” पुस्तिकेचे प्रकाशन मुंबई, दि. १९ एप्रिल...

शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे व मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात मॉलचे उद्घाटन

विकासकामांना गती देण्याचा संकल्प; स्थानिकांना आधुनिक सुविधांची उपलब्धता पुणे, दि....