शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर:उद्योगमंत्री उदय सामंत; धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन

Date:

पुणे: “सर्वसामान्य माणसाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी वेळोवेळी त्यांना मदतीचा हात देण्याचा धर्म शिवसेना पक्षाने पाळलेला आहे. धर्मवीर आनंद दिघे अखेरच्या श्वासापर्यंत सामान्यांसाठी कार्यरत होते. त्यांच्याच नावाने शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष’ ही लोकचळवळ सुरु झाली आहे. पुण्यातील नागरिकांना या कक्षाचा चांगला लाभ होईल व शिवसेनेची सामान्य लोकांप्रती असलेली बांधिलकी अधिक घट्ट होईल,” असे प्रतिपादन उद्योग तथा मराठी भाषामंत्री उदय सामंत यांनी केले.

अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तवर धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे राज्य प्रमुख व शिवसेनेचे राज्य निवडणूक समन्वयक वैभव वाघ यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले. सारसबागेजवळील शिवसेना भवनात आयोजित या कार्यक्रमावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शहरप्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे, सहसंपर्क प्रमुख अजय भोसले, रमेश कोंडे, सुधीर कुरूमकर, आबा बागुल यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिवसैनिकांचा गौरव करण्यात आला. तसेच ठाण्यातील टेम्भीनाक्यावरील देवीचे पूजन व शासकीय योजनांची दहीहंडी फोडण्यात आली.

उदय सामंत म्हणाले, “शासकीय योजनांचा लाभ तळागाळातील लोकांना मिळावा, यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने पुढे यावे. सहायता कक्षाची चळवळ गावागावात पोहोचावी, यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. अशा उपक्रमांतून समाज तर घडतोच, पण तुमच्यातील नेतृत्वही विकसित होते. चांगले काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी शिवसेना नेहमीच उभी राहते. वैभव वाघ यांच्यासारख्या उमद्या तरुणाच्या पुढाकारातून पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जाईल, असा विश्वास आहे.”

डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “शासनामार्फत विविध योजना, आरोग्यसुविधांसाठी सहायता निधी उपलब्ध असतो. मात्र, माहितीच्या अभावाने अशा योजना सामान्यांपर्यंत पोहोचत नाहीत. या योजना गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी आज सुरु होत असलेल्या या धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाची मोठी मदत होईल. अडचणीच्या काळात मदतीचा हात मागण्यासाठी येणाऱ्या लोकांना शिवसेना भवन हे दिघे साहेबांच्या आनंदाश्रमाप्रमाणे वाटावे, असे कार्य आपण सर्वानी येथून करायला हवे.”

प्रास्ताविकात वैभव वाघ यांनी सांगितले की, शासकीय योजनांचा अक्षय्य ठेवा जनसामान्यांपर्यंत पोहचवत, तसेच लोकहिताचे काम करत पुणे शहरातील शिवसेना भवनाला आनंद दिघे यांच्या विचारांचा ‘आनंदाश्रम’ बनवायचा आहे. मागेल त्याला मदत आणि प्रत्येकाच्या समस्यांचे निराकरण या दिघे साहेबांच्या संस्काराला अनुसरून अखंड काम सुरु राहील. गोरगरीब जनतेच्या हितासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा घेऊन एकनाथ शिंदे व सर्व सहकारी मोठ्या तळमळीने काम करीत असून, त्यांचे हे कार्य अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जायचे आहे.”

महिला आरक्षण विधेयक नामंजूर होणे दुर्दैवी
माध्यमांशी बोलताना उदय सामंत म्हणाले, “कॅप्टन अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही. अशा नीच प्रवृत्ती ठेचून काढण्याची शिवसेनेची भूमिका आहे. या प्रकरणाचा एसआयटी तपास सुरु असून, त्यातील सत्य लवकरच बाहेर येईल. दोषींना सोडले जाणार नाही. तपास यंत्रणेच्या कामात मला हस्तक्षेप व त्यावर भाष्य करता येणार नाही. खरातसोबत कोणाचे फोटो आले म्हणजे तेही तितकेच दोषी आहेत, असे मानने योग्य नाही. महिलांसाठी आणलेले विधेयक लोकसभेत नामंजूर होणे दुर्दैवी होते. हा दिवस खऱ्या अर्थाने काळा दिवस होता. देशातील महिलांना सन्मान व न्याय देण्यासाठी आणलेले हे विधेयक नाकारून विरोधकांनी महिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांना महिलांसमोर जाऊन आता मते मागण्याचा अधिकार नाही. महाविकास आघाडी आणि काँग्रेस यांना महिलांना आरक्षण मिळू द्यायचे नाही, हेच यातून स्पष्ट झाले आहे. उबाठा गटाच्या माजी खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला असेल, तर त्यांचे अभिनंदन करायला हवे, असे उदय सामंत म्हणाले. असेल तर त्यांचा अभिनंदन केलच पाहिजे, असे उदय सामंत यांनी नमूद केले. विधानपरिषदेच्या संदर्भात निर्णय घेण्याचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांना आहेत. १२ तारखेपूर्वी याबाबत निर्णय होईल. नवीन चेहरा द्यायचा की जुना चेहरा द्यायचा, याचे अधिकार शिंदे यांनाच आहेत. त्यामुळे योग्यवेळी निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘नोटसम्राट 2 – नोटबंदीचा लढा’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील प्रश्नांची जाणीव आहे. त्यांनी...

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य

अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव पुणे : साडेतीन...

मुंबई युवक काँग्रेसचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

“गिग वर्कर्स न्याय अभियान” पुस्तिकेचे प्रकाशन मुंबई, दि. १९ एप्रिल...

शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे व मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुण्यात मॉलचे उद्घाटन

विकासकामांना गती देण्याचा संकल्प; स्थानिकांना आधुनिक सुविधांची उपलब्धता पुणे, दि....