Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वाड्यात रंगले संगीत बैठक मालेतील दुसरे पुष्प !

Date:

पुणे :   ​
रविवारची गिरीवनमधील प्रसन्न सकाळ, मराठी वास्तुशैलीतील ढेपे वाड्याच्या भव्य दिवाणखाण्यातील

​ ​

रसिकांची बैठक, अशा वातावरणात सौ.सानिया पाटणकर यांच्या गायनाची बहारदार मैफल रंगली !

ढेपे वाड्याच्या वास्तुत मराठी संस्कृती जपणार्‍या विविध कला जोपासण्याच्या प्रमुख हेतूने पुर्वी वाड्यांच्या दिवाणखान्यांमध्ये होणार्‍या  शास्त्रीय, उपशास्त्रीय गाण्यांच्या बैठकींच्या पध्दतीने संगीत मालिकेचे आयोजन करण्यात आले होते.
संगीत बैठक मालेतील  हे दुसरे पुष्प सानिया पाटणकर यांच्या  गायनाने रविवार, दि. ​५​ मार्च ​२०१७​ रोजी सकाळी पार पडले. हा कार्यक्रम ढेपेवाडा

​ (​

गिरीवन, डोंगरगांव, ता.मुळशी

​) ​

येथे आयोजित करण्यात आला होता.

ढेपे वाडा परिवाराचे नितीन ढेपे आणि ऋचा ढेपे यांनी स्वागत केले.
सानिया पाटणकर यांनी बैरागी तोडी या सकाळच्या रागाने सुरुवात केली. उपशास्त्रीय संगीत, नाटयसंगीत, अभंग अशा सादरीकरणाने रसिकांना मोहून टाकले. त्यांना तबल्यावर हेरंब जोगळेकर, तानपुऱ्यावर शुभांगी आणि हार्मोनियमवर दत्तराज सुर्लेकर यांनी साथ संगत केली
मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे,महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी,अॅड.मकरंद आडकर डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, आनंद सराफ

​,श्याम ढवळे ​

इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

वाडा संस्कृतीतून मैफल संस्कृती पुढे जावी :डॉ . सदानंद मोरे ​
—————-
‘मराठ्यांच्या काळात वाडा संस्कृतीतून संगीत बैठक आणि मैफल संस्कृतीला विकसित होण्यास वाव मिळाला ,मैफिली या वाड्यातच अनुभवणे अलौकिक असते . ही उत्सव ,गाणे ,बैठक आणि मैफलीची संस्कृती ढेपे वाड्यामुळे पुनरुज्जीवित होत आहे याचा विलक्षण आनंद होत आहे ‘,असे उद्गार मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ . सदानंद मोरे यांनी यावेळी बोलताना काढले .
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा . मिलिंद जोशी म्हणाले ,’सर्जनशील वेदनेतून ढेपे वाड्याची निर्मिती झाली . अशा वाड्यातील मैफलीमुळे दैनंदिन जीवनातील ताप आणि ताण विसरायला होते . ही परंपरा पुढे जावी .
‘आजच्या आधुनिक पिढीला सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी निर्मिलेल्या आणि पेशवाईपर्यंत उत्तरोत्तर समृद्ध होत गेलेल्या वास्तुशैलीची जवळून ओळख करून देण्याच्या उद्देशाने ’ढेपे वाडा’ वास्तु उभारण्यात आली. अस्सल मराठी मनाच्या कोपऱ्यात अनमोल म्हणून जपलेले सारे काही पुन्हा आधुनिक जगापुढे आणण्यासाठी अत्यंत अविरत प्रयत्नातून आम्ही आलिशान मराठा वास्तुशैलीचा आधुनिक आविष्कार जगापुढे घेऊन आलो आहोत. आपल्या वाडासंस्कृतीचा परिसस्पर्श नव्याने अनुभवता यावा आणि नव्या पिढीला देखील ’वाडा’ संस्कृतीची ओळख व्हावी. या जाणिवेतून आम्ही ’ढेपे वाडा’ वास्तु साकारली आणि संगीत बैठकीचे आयोजन केले, असे नितीन ढेपे यांनी  प्रास्ताविकात सांगितले.
सानिया पाटणकर यांनी वयाच्या सहाव्या वर्षापासून शास्त्रीय संगीतास सुरूवात केली. लीलाताई घारपुरे यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच ‘जयपूर अत्राऊली घराण्या’च्या डॉ. अश्‍विनी देशपांडे यांच्याकडे 14 वर्षे संगीताचे धडे घेतले. त्या दूरदर्शन आणि आकाशवाणी वरील प्रख्यात कलाकार आहेत. त्यांनी राष्ट्रीय स्तरावरील ’ऑल इंडिया रेडिओ’वरील शास्त्रीय संगीतात प्रथम श्रेणी मिळविली आहे. त्यांच्या संगीत बैठकी भारत आणि भारताबाहेर उत्तम प्रतिसादात पार पडल्या आहेत.  ढेपे वाडयातील मैफलीलाही उत्तम प्रतिसाद मिळाला.
​​
या संगीत बैठक मालेतील पहीला कार्यक्रम पं. कैवल्य कुमार यांचा झाला होता. ​
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...