टी- 10 क्रिकेट टूर्नामेंट – 2018 ला प्रारंभ
पुणे: महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ च्या एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्चच्या वतीने आयोजित टी -10 क्रिकेट टूर्नामेंट-2018ला प्रारंभ झाला. या स्पर्धेचे यंदाचे 10 वे वर्ष आहे. ही स्पर्धा दिनांक 18 जानेवारी पर्यंत आझम कॅम्पस क्रिकेट मैदानावर होणार असल्याची माहिती स्पर्धेचे संयोजक विसेंट केदारी यांनी दिली.
एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्चच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी सर्व संघाचे स्वागत केले.
चार दिवसीय या क्रिकेट स्पर्धेमध्ये 14 संघ सहभागी झाले आहेत. यात 9 हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालये आणि 5 हॉटेल उद्योग संस्था आहेत. संघ कर्णधार यांच्या उपस्थितीत स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले.
एम. ए. रंगूनवाला इन्स्टिटयूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँण्ड रिसर्च, डॉ. डि.वाय.पाटील (बीएचएमसीटी), डॉ. डि.वाय.पाटील (बीएससीएचएस), अजिंक्य डि.वाय.पाटील, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अम्ब्रोसिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मॅरिओट सुईटस, ह्यात पुणे, फोर पॉईंट बाय शेराटॉन, अॅम्ब्रोसिया रिसॉर्ट, कोर्टयार्ड बाय मेरिओट हिंजवडी, डॉ. ए.बी.तेलंग इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, तसावा टूर्स अॅण्ड ट्रव्हल्स् या संघांचा समावेश आहे.
—————————— —————————— ——-