पुणे-वाहतुकीचे नियम तोडू नका, पोलीस नसले तरी आम्ही येथे आहोत असे सांगत नवजीवन समाज सेवा मंडळा ने नवीन वर्षाची सुरुवात वाहतूक विषयक कार्यातून सुरू केलीआहे.
जुना पुणे-मुंबई रोड वरती सुरू असलेले स्मार्ट सिटी रोड चे काम चालू असल्याने विश्रांतवाडी वरून येणारा रोड कामानिमित्त बंद केला आहे व पर्यायी मार्ग उपलब्ध केला आहे तरी ही लोक आपल्या व पुढील व्यक्तीच्या जीवाची पर्वा न करता आपले वाहन नो एन्ट्री मध्ये घालत आहे. यांना प्रतिबंध करण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी या मंडळाचे कार्यकर्ते आता स्वतः वेळोवेळी रस्त्यावर येत आहेत .
येथे होणाऱ्या नियमबाह्य वाहतुकी संदर्भात मंडळाचे सभासद राहुल मोरे यांनी वेळोवेळी वाहतूक विभागाकडे तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष करतआल्याने मंडळाने स्वतः या कामी पुढाकार घेतला आहे.
या उपक्रमामध्ये मंडळाचे सभासद व कार्यकर्ते रवींद्र नितनावरे संजू जोशी मनोहर कामठे राजू जोशी प्रशांत ओसवाल बाळू भोसले विजय हुलगुंडे आदित्य कांडेकर विजय कराळे सहभागी झाले आहेत .