नसरापूर प्रकरण:आरोपीचा न्यायालयात निर्लज्जपणा, बचावासाठी किरकोळ भांडणातून गोवल्याचा बनाव; 7 मे पर्यंत पोलिस कोठडी

Date:

पुणे-भोर तालुक्यातील नसरापूर येथील चार वर्षांच्या चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम आरोपीला पुणे न्यायालयाने ७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. सुनावणी दरम्यान आरोपीने स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘भांडणातून गोवल्याचा’ धक्कादायक बनाव रचला, मात्र पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता न्यायालयाने हा दावा फेटाळून लावत त्याला पोलिस कोठडीत पाठवले आहे.

भीमराव प्रभाकर कांबळे (वय ६५, रा. भोर) असे कोठडी झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (खून), ६४ (बलात्कार), ७४ (विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे), १३७ (२), १४० (१), १४० (३) (अपहरण) यांसह लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत चिमुकलीच्या आईने पुणे ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ही घटना शुक्रवारी (एक मे) दुपारी तीन ते रात्री आठ दरम्यान राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत नसरापूर गावाजवळ घडली.पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून कडेकोट बंदोबस्तात विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्या न्यायालयात हजर केले.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला “काही तक्रार आहे का?” अशी विचारणा केली. त्यावर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे उत्तर देत म्हटले की, “किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात विनाकारण गोवण्यात आले आहे.” आपल्या कृत्याचा कोणताही पश्चात्ताप त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. मात्र, तपासातील निष्पन्न तथ्ये आणि चिमुकलीचा मृतदेह ज्या अवस्थेत सापडला, त्यावरून त्याचा हा बनाव न्यायालयात टिकू शकला नाही.

तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी आरोपीच्या जास्तीत जास्त पोलिस कोठडीची मागणी करताना अनेक महत्त्वाचे मुद्दे न्यायालयासमोर मांडले. आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केल्याचे सिद्ध करण्यासाठी त्याची वैद्यकीय आणि रासायनिक विश्लेषण तपासणी करणे आवश्यक आहे. आरोपीची शारीरिक क्षमता तपासणे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.आरोपीने यापूर्वी अशा प्रकारचे कृत्य केले आहे का किंवा पीडितेवर याआधीही अत्याचार झाले होते का, याचा शोध घ्यायचा आहे. ज्या शस्त्राने चिमुकलीची निर्घृण हत्या केली, ते शस्त्र अद्याप जप्त करायचे आहे. या गुन्ह्यात आरोपीला इतर कोणी मदत केली आहे का किंवा यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याची सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.
दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपीला ७ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या काळात पोलिस आरोपीकडून हत्येचा घटनाक्रम आणि पुराव्यांची साखळी जोडण्याचा प्रयत्न करणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

वरुणराजा ऐकेना..धरणात पाणी साठेना…

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण समूहातील चारही...

हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक अन्यथा गय करणार नाही- तुकाराम मुंढे

मुंबई-राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने...

वारकऱ्यांच्या सोयीसाठी पुणे महानगरपालिकेकडून सर्वंकष नियोजन- अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर

पुणे- आगामी आषाढी वारी व पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या...