नवले पुलावरील आंदोलनात पोलिसांचा बळाचा वापर:आयुक्तांचा मात्र लाठीमाराचा इन्कार, चिमुकलीवर रात्री उशिरा अंत्यसंस्कार

Date:

माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत सांत्वनासाठी येऊ नये:नसरापूरच्या पीडितेच्या वडिलांचे राजकारण्यांना आवाहन; नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी
पुणे-नसरापूर येथील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते आणि पदाधिकारी पीडित कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नसरापूरला धाव घेत आहेत. मात्र, “जोपर्यंत माझ्या चिमुकलीला न्याय मिळत नाही आणि त्या नराधमाला फाशी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने आमच्या घरी येऊ नये,” असे कळकळीचे आवाहन पीडितेच्या वडिलांनी केले आहे. देहू येथे लेकीच्या आस्थी विसर्जनासाठी गेले असताना त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे.

१ मे रोजी नसरापूर येथे ६५ वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून नेत्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरू झाले आहे. मात्र, पीडितेचे वडील सध्या विधींसाठी घराबाहेर असताना त्यांच्या घरी नेत्यांची गर्दी होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. यावर संताप आणि दुःख व्यक्त करत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

नेमके काय म्हणाले पीडितेचे वडील?

“नमस्कार! मी पीडित मुलीचा वडील. आता मी आस्थी विसर्जनासाठी देहू इथे आलो असताना, माझ्या घरच्यांकडून मला फोन आला की, तिथे बरेच राजकारणी लोकं सांत्वन करण्यासाठी किंवा भेटायला येत आहे. माझी आणि माझ्या कुटुंबाची एकच इच्छा आहे. जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही, त्या नराधमाला जोपर्यंत फाशी मिळत नाही, तोपर्यंत एकाही राजकारण्याने आमच्या घरी भेटायला येऊ नये. एवढी माझी नम्र विनंती आहे. जेव्हा त्या नराधमाला फाशी होईल तेव्हाच राजकारणी किंवा जे कुणी लोकं आहेत, त्यांना आम्हाला भेटायचं असेल तेव्हा भेटू. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही नराधमाने माझ्या सांत्वनासाठी येऊ नये, ही माझी नम्र विनंती आहे”, असे पीडितेचे वडील म्हणाले आहेत.

नराधमाच्या शिक्षेसाठी नवले पुलावर आंदोलन

दरम्यान, ६५ वर्षांच्या नराधमाने या चार वर्षांच्या बालिकेला ज्या क्रूरतेने संपवले आणि तिचा मृतदेह गोठ्यातील शेणात लपवून ठेवला, त्यावरून जिल्हाभरात जनक्षोभ उसळला आहे. आरोपीला तातडीने फाशी द्यावी किंवा त्याला आमच्या हवाली करावे, या मागणीसाठी नसरापूर ग्रामस्थ आणि पीडितेच्या नातलगांनी शनिवारी नवले पुलावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे सुमारे ४ तास पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत, आंदोलकांना नवले पुलावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.

मात्र, पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अशाप्रकारचा कोणताही लाठीचार्ज झालाच नसल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, “आम्ही पीडितेच्या आई-वडिलांना विश्वासात घेऊन त्यांची समजूत काढली. काही लोक त्यांना बाहेर पडू देत नव्हते, त्यांना केवळ बाजूला करण्यात आले. आई-वडील स्वखुशीने गाडीत बसले. पोलिसांनी कोणतेही ‘इमोशनल ब्लॅकमेलिंग’ केलेले नाही. पोलिसांनी मृत मुलीच्या आई-वडिलांना समजावून तेथून बाहेर काढल्यावर पीडित चिमुकलीच्या पार्थिवावर शनिवारी रात्री उशिरा शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

US सिनेटमध्ये इराण युद्धाविरोधात प्रस्ताव मंजूर; ट्रम्प यांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

सिनेटच्या ठरावावर ट्रम्प यांची टीका; होर्मुझमधील जहाजांची वर्दळ तिप्पट,...

बरसो रे ..धरण क्षेत्रात ..मेघा..मेघा ….

पुण्यात रात्रभर ‘टिप टिप बरसा’ ; धरणांतील पाणीसाठा वाढीची...

दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

सह धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण आदेश पुणे : कै. सौ. लक्ष्मीबाई...

देवेंद्र फडणविसांची तथाकथित दैवीशक्ती शेतकरी, महिला व तरुणांचे प्रश्न सोडवताना कुठे जाते?

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसचा शेतकरी मेळावा...