विद्यार्थ्यांच्या कलागुणांमुळे भारावले पालक
पुणे : गोकुळनगर (कात्रज -कोंढवा रोड) येथील ‘युनिक इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज’च्या वार्षिक विविध गुणदर्शन,स्नेह संमेलनाचा कार्यक्रम शुक्रवारी सायंकाळी गणेश कला क्रीडा केंद्र येथे झाला.
या कार्यक्रमाला जयेश शेंडकर (प्रशासकीय अधिकारी, शिक्षणमंडळ, पुणे महानगरपालिका) आणि नगरसेवक वसंत मोरे प्रमुख पाहुणे म्हणून होते.
युनिक इंग्लिश मीडियम स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज संस्थेचे अध्यक्ष डॉ.आर.ए.मुलाणी, युनिक इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटचे संचालक डॉ. शरद इनामदार, शाळेच्या प्राचार्य जयश्री जाधव, उपप्राचार्य सुनिता चांदगुडे,अॅड. तारीक पटेल, श्री. सोलनकर, श्री. काळे, यावेळी उपस्थित होते.
संस्थेच्या बालवाडी ते इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात विविध कला सादर केल्या. यामध्ये नृत्य, नाटिका यांचा समावेश होता. .