पुणे :पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया सेलचे उदघाटन व अधिकृत फेसबुक पेजचे उद्घाटन ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांच्या हस्ते ,शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
चैतन्य पुरंदरे हे या सेल चे प्रमुख असणार आहेत .
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम काँग्रेस भवन येथे पार पडला
’काँग्रेस ची विचारधारा सर्वसमावेशक आणि व्यापक आहे ,तरीही काँग्रेस विचार आणि नेतृत्वाबद्दल सोशल मीडियावर अपप्रचार केला जातो . हा अपप्रचार सोशल मीडियावरच खोडून काढावा,आणि चोख उत्तर द्यावे ’असे आवाहन उल्हास पवार यांनी केले
पुण्यात सोशल मीडिया वर कार्यरत काँग्रेस कार्यकर्त्यांची फळी उभारणार असून त्याद्वारे सर्वांपर्यंत पोहोचणार असल्याचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.
’काँग्रेस नेतृत्वाचे चारित्र्यहनन आणि बदनामीची मोहिम सोशल मीडियात चालवली जात असून या मोहिमेला काँग्रेस सोशल मीडिया सेल मुद्देसुद पण आक्रमकपणे उत्तर देईल,’असे सेल प्रमुख चैतन्य पुरंदरे यांनी सांगितले
.माजी आमदार मोहन जोशी ,माजी शहराध्यक्ष अभय छाजेड ,रोहित टिळक
,सुरेश धर्मावत हेही यावेळी उपस्थित होते .