मणिपूर हिंसाचारात ‘सुपरपॉवर’चे काय झाले? 2002 च्या गुजरात दंगलीत या ‘सुपरपॉवर’चे काय झाले? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना केले आहेत. आपल्याकडे खरोखरच इतकी प्रभावी “सुपरपॉवर” आहे, तर मग भारत आणि मालदीवमधील बिघडत चाललेले द्विपक्षीय संबंध वाचविण्यासाठी तुम्ही त्याचा वापर का केला नाही? चीनला आपली जमीन बळकावण्यापासून रोखण्यासाठी या “सुपरपॉवर”चा वापर का केला जात नाही? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, जिनिव्हास्थित इंटरनल डिस्प्लेसमेंट मॉनिटरिंग सेंटरने (IDMC) मणिपूरमधील हिंसाचारानंतर सर्वाधिक विस्थापन झाल्याचे (67,000; 2023 मध्ये दक्षिण आशियातील एकूण विस्थापनांपैकी 97%) म्हटले असून 2018 पासून भारतातील संघर्ष आणि हिंसाचारामुळे देखील एवढे विस्थापन झाले नव्हते. कदाचित, तुम्ही ही “सुपरपॉवर” वापरली नसेल कारण, तुम्ही आणि तुमच्या गुंडांनी गुजरात आणि मणिपूरमधील हत्याकांडाला पाठबळ देऊन ते घडवून आणले असावे .
https://x.com/Prksh_Ambedkar/status/1791386585512226927
ॲड. आंबेडकर म्हणाले की, स्प्रींग रिव्हाॅल्यूशनला पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या शेजारील म्यानमारमध्ये 4000 हून अधिक निदर्शकांच्या हत्या थांबवण्यासाठी या “सुपरपॉवर”चा वापर का केला गेला नाही? इस्रायल-हमास यांच्यात शस्त्रसंधी आणि बंधकांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करून हजारो जीव वाचवण्यासाठी तुम्ही सुपरपॉवरचा वापर का केला नाही? ‘इतना ज्यादा झूठ बोलने वाला आदमी देश तो क्या दुनिया में कोई नहीं हुआ होगा ! कोई नहीं, आप बोलते जाइए, हम लपेटते जाते हैं !’ असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.