पुणे – शास्त्रीय संगीताला चांगले दिवस आहेत. शास्त्रीय संगीत शिकणारा प्रत्येक जण तानसेन किंवा भीमसेनच होईल असे नाही, तर शास्त्रीय संगीताची उत्तम जाण असणारे कानसेनही निर्माण झाले पाहिजेत. असे दाद देणारे कानसेन रसिकांमध्ये असतील तर गाणे खुलते. असे मत सुप्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाच्या (बीएमसीसी) ‘हेरिटेज कलेक्टिव्ह विभागा’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘विरासत’ या कार्यक‘मात श्री. देशपांडे विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ कार्यक‘माच्या अध्यक्षस्थानी होते. उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. सुरेश वाघमारे, डॉ. आशीष पुराणीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. देशपांडे पुढे म्हणाले, ‘सगळेच भीमसेन झाले तर समोर कोण बसणार? कान पकडणारे लोकही समोर हवेत. प्रत्येकाने रोज एक तरी बंदीश ऐकली पाहिजे, म्हणजे हळूहळू शास्त्रीय मैङ्गलींची आवड निर्माण होईल. त्यातूनच चांगला रसिक वर्ग तयार होऊ शकेल. प्रत्येक मैङ्गलीतील गायनाचा व विचाराचा रियाज महत्वाचा असतो. ही गाणी नाहीत, पण गाणी सादर करण्याची तंत्र आहेत. पुण्याची ती परंपरा आहे.’
श्री. देशपांडे पुढे म्हणाले, ‘शास्त्रीय संगीत शिकणार्या प्रत्येकाने गुरू जे सांगतात तेच केले पाहिजे. प्रत्येकाला आवाजाप्रमाणे स्वरांची संस्कृती विकसित करावी लागते. आवाजाच्या पध्दतीने गाणे घडवावे लागते. आपल्या चुका आपल्याला आतमध्येच कळत असतात. त्याकडे आपण सोईस्करपणे दुर्लक्ष करतो. आपण जेव्हा गातो तेव्हा आपण काय चुका केल्या ते कळते. आपण बेसूर होतो, उच्चार चुकतात. तेव्हा आपण आपल्या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न करतो. हे अयोग्य आहे. आपणच आपले चांगले परीक्षक असतो. एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे.’
‘हेरिटेज कलेक्टिव्ह विभागा’च्या प्रमुख डॉ. राजश्री गोखले, डॉ. अनघा काळे, प्रा. वृषाली महाजन यांनी कार्यक‘माचे संयोजन केेले. मृण्मयी सुनावळे यांनी सूत्रसंचालन केले, प्राचार्य रावळ यांनी प्रास्ताविक केले, सिध्दी देशमुख यांनी आभार मानले.
दाद देणारे कानसेन असतील तर गाणे खुलते – राहुल देशपांडे
Date: