~ एका उपकरणासाठी दरमहा रु. २९ च्या विशेष सुरुवातीच्या ऑफर सह परिवारासाठी दरमहा रु. ८९ प्रती ४ उपकरणांपर्यतचे प्लान्स ~
~ ४ के ॲड फ्री स्ट्रिमिंग सह कोणत्याही उपकरणावर अनोखा अनुभव- कनेक्टेड टिव्ही आणि ऑफलाईन व्ह्युईंगचीही सुविधा ~
~ सक्षम कंटेंट सह टॉप ओरिजिनल सिरीज, ब्लॉकबस्टर मुव्हीज, विविध भाषांमध्ये सर्वोत्कृष्ट हॉलिवूडचे चित्रपट, मुले आणि पारिवारीक हब तसेच २१ टिव्ही चॅनल्स, व्हायाकॉम १८ टिव्ही नेटवर्क च्या सिरीयल्स ‘ बिफोर टिव्ही’ प्रदर्शित’~
२५ एप्रिल २०२४, राष्ट्रीय- इंडियन प्रिमियर लीगला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर आणि पुरस्कार विजेत्या एन्टरटेन्मेंट हब असलेल्या जिओ सिनेमाने आता प्रिमियम मनोरंजनासाठी प्रत्येक भारतीय घरात आपले नाव प्रस्थापित केले आहे. आता ग्राहकांच्या आणखी काही समस्या जसे मर्यादित उपकरणांची क्षमता, कमी गुणवत्तेचे व्हिडिओ, महाग सबस्क्रीप्शन प्लान्स इत्यादींवर मात करण्यासाठी जिओ सिनेमा कडून त्यांच्या नवीन सबस्क्रीप्शन योजना ‘जिओ सिनेमा प्रिमियम’ची घोषणा करण्यात आली आहे. यातील प्लान्स हे बाजारपेठेत नवीन असे म्हणजेच दरमहा रु.२९/- पासून सुरु होत असून यांत ॲड फ्री अनुभव हा ४ के गुणवत्तेसह ऑफलाईन व्ह्युईंग अनुभवाने युक्त असेल. सदस्यांना आता यामध्ये विशेष सिरीज, मुव्हीज, हॉलिवूड, मुले आणि टिव्ही मनोरंजन हे कनेक्टेड टिव्ही सह कोणत्याही उपकरणावर पाहता येणार आहेत.
संपूर्ण भारतातील विविध विभागातील वापर पाहता, फॅमिली प्लानची सुध्दा घोषणा करण्यात आली असून हा प्लान दरमहा रु ८९/- च्या किंमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. यामध्ये एकाच वेळेस ४ स्क्रीन्सवर वापर करता येणार आहे. सध्याच्या जिओ सिनेमा प्रिमियम सदस्यांना आता ‘फॅमिली’ प्लानचे लाभ आता कोणत्याही अधिकच्या खर्चा शिवाय प्राप्त होणार आहेत.
सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रिमियर लीग सह खेळांशी संबंधित कंटेंट आणि मनोरंजनात्मक कंटेंट हा ॲड सपोर्टेड ऑफरिंग नुसार मोफत उपलब्ध होणार आहेत, या व्यतिरिक्त जिओ सिनेमा प्रिमियम मेंबर्सना खालील गोष्टींचा ही विशेष ॲक्सेस उपलब्ध होणार आहे-
स्थानिक भाषांमध्ये आंतरराष्ट्रीय कंटेंट – आता जागतिक स्तरावरील हॉलिवूडच्या सिरीज आणि मुव्हीज जगभरांतील सर्वात मोठ्या स्टुडिओज बरोबरच्या भागीदारीतून उपलब्ध होणार असून यांत पिकॉक, एचबीओ, पॅरामाऊट आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांचा समावेश आहे. गेम ऑफ थॉर्न्स, हाऊस ऑफ ड्रॅगन, ओपनहायमर, बार्बी आणि अशा अनेक मालिका आता हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली आणि मराठीतही उपलब्ध होणार आहेत.
परिवार आणि मुलांसाठी संपूर्ण मनोरंजन : आता सर्वोत्कृष्ट भारतीय आणि आंतरराष्ट्रीय टून्स जसे मोटू पतलू, शिवा, रुद्रा पासून ते पोकेमॉन, पेपा पिग आणि पॉ कंट्रोल, दि किड्स ॲन्ड फॅमिली हब मध्ये हजारो तासांच्या उच्च गुणवत्तेच्या मुव्हीज आणि सिरीज आपल्याला पहायला मिळणार आहेत. जिओ सिनेमा मधील पॅरेंटल कंट्रोल वैशिष्ट्यामुळे कोणता कंटेंट मुलांनी पहावा याची सुविधा सुध्दा उपलब्ध आहे.
विविध शैलींनुसार आणि ब्लॉकबस्टर चित्रपट: बहुचर्चित अशा रणनीती:बालाकोट ॲन्ड बियाँड (जिम्मी शेरगिल, लारा दत्ता, आशिष विद्यार्थी), मर्डर इन माहिम (विजय राज, आशुतोष राणा), पिल (रितेश देशमुख) सारख्या आगामी सिरीज सह अनेक मालिका आता जिओ सिनेमाच्या प्रिमियम सदस्यांसाठी असून दर महिन्याला या सिरीज तर येतीलच पण त्याच बरोबर भारतातील काही आवडीच्या मालिका जसे असूर, ताली आणि कालकूट ही आपल्याला पहायला मिळणार आहेत. या मंचाच्या माध्यमातून आपल्याला आता दर महिन्याला बॉलिवूड प्रिमियरही पाहता येणार असून याची सुरुवात मे महिन्यापासून जरा हटके जर बचके पासून होणार आहे.
बिफोर टिव्ही प्रिमियर्स आणि लाईव्ह चॅनल्स: आता सदस्यांना कलर्स, निकलोडियन आणि कलर्सच्या अन्य स्थानिक भाषांमधील चॅनल्स ची संपूर्ण श्रृंखला आता उपलब्ध होणार असून सदस्यांसाठी विशेष म्हणजे या एपिसोड्स टिव्हीवर प्रदर्शित होण्याच्या आधी पाहता येणार आहेत. त्याच बरोबर व्हायाकॉम १८ नेटवर्क वरील २० हून अधिक चॅनल्स स्ट्रीम ही होणार आहेत.
जिओ सिनेमा ने हाय डेसिबल आणि बहुप्रतिक्षित अशी मोहिमही सुरु केली असून ‘तो आज क्या प्लान है?’ असे या मोहिमेचे नाव आहे. ही मोहिम जिओ सिनेमा प्रिमियम चे प्रमुख लाभ अधोरेखित करत असून आजच्या ग्राहकांचा मनोरंजनात्मक प्लान शोधण्यासाठीचा तणाव विनोदी पध्दतीने सादर केला आहे.