टाकाऊतून टिकाऊ : घन कचरा व्यवस्थापन प्रकल्प मॉडेल स्पर्धेचे पारितोषिक वितरण
स्कायसायक्यूच्या स्पर्धेस राज्यभरातून विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद ,वीस हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे:स्कायसायक्यू, रोटरी क्लब डिस्ट्रिक्ट 3131, ग्यान की, वनराई, पराडकर फाउंडेशन आणि बिग एफ एम 95 या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने,’ टाकाऊतुन टिकाऊ ‘ही मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारी राज्यस्तरीय घन कचरा व्यवस्थापन स्पर्धा 2019-20 घेण्यात आली. स्पर्धेचे हे
तिसरे वर्षं असून, 20,000 पेक्षाजास्त शालेय मुले या वर्षी सहभागी झाली . स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पुण्यात पार पडला.
हा उपक्रम स्कायसायक्यु आणि रोटरी यांचेमार्फत मुलांसाठी दरवर्षी विनामूल्य राबविण्यात येतो.
ह्यातील निवडक 150 मुले व शिक्षक 14 व 15 फेब्रुवारी रोजी आपल्या मॉडेल्ससह पुण्यात आली होती. त्यांच्या मॉडेल्सचे प्रदर्शन आयसर (पाषाण)आणि साने गुरुजी स्मारक येथे आयोजित करण्यात आले होते.
एकंदरीतच विद्यार्थ्यांची विज्ञान निष्ठा वाढवण्यासाठी डॉ रघुनाथ माशेलकर आणि डॉ अरविंद नातू तसेच आयसर संस्थेतील शास्त्रज्ञांनी त्यांना मार्गदर्शन केले.
या स्पर्धेच्या बक्षीस समारंभात रोटरीचे माजी प्रांतपाल अरुण कुदळे, वनराईचे रवींद्र धारिया, पुणे महानगरपालिकेचे सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक आदी मान्यवर साने गुरुजी स्मारक येथील निळू फुले सभागृहात उपस्थित होते. संयोजक दीप्ती पुजारी यांनी स्वागत केले.
ह्या समारंभामध्ये कचरा व्यवस्थापन ही एक लोकसहभागातून उभी राहिलेली चळवळ व्हावी ही अपेक्षा सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी व्यक्त केली.
अपेक्षेला प्रतिसाद देत स्कायसायक्यू आणि पराडकर फाउंडेशन या संस्थांनी या वर्षी 2 लक्ष घरांतील वर्गीकृत प्लास्टिक विकत घेण्या ची घोषणा केली .
पुणे शहर आणि जिल्ह्यातील 1200 शाळा आणि 100 गावांतील समग्र कचरा व्यवस्थापनासाठी मदत करण्याचे सर्व संस्थांनी आश्वासन दिले.