‘आंतरराष्ट्रीय मंदी’ विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘आंतरराष्ट्रीय मंदी आणि भारताची भूमिका’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.१४,१५ फेब्रुवारी रोजी ही परिषद आझम कॅम्पस येथे पार पडली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे वाणिज्य आणि व्यवस्थापन शास्त्र विभागाचे अधिष्ठाता डॉ पराग काळकर यांच्या हस्ते उदघाटन झाले. दुबईच्या उद्योजक यास्मिन भट,ताहेर धुंडियावाला,नसरीन मंडल,अक्षय जैन यांच्यासह शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ,संशोधक,प्राध्यापक,विद्यार्थी या परिषदेत सहभागी झाले.आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.शैला बूटवाला यांनी स्वागत केले.